खाज

394
Pratik asked 3 weeks ago

सेक्स केल्यानंतर लिंगाच्या वरील टोकाला खाज सुटते. सेक्स करताना निहार, जास्मीन, व खोबरेल तेल वापरले त्याचा परिणाम असेल का?

1 Answers
let's talk sexuality answered 3 weeks ago

सर्वात आधी हे लक्षात घ्या की, संबंधांच्या वेळी तेल वापरु नका. तेल वा तेलयुक्त कुठलंच वंगण वापरु नका. तेल- तूप – क्रिम याने योनीतील जिवाणूंचं संतुलन बिघडण्याची शक्यता असते. अन तुम्ही म्हणत आहात तसे पण होण्याची शक्यता आहे. पण तरीही लिंगाच्या टोकाला खाज का सुटते याची कारणं शोधायला तर हवी आहेत, हे समजलं तर त्यावर उपाय करता येतील. त्यासाठी डॉक्टरांना भेटा.

जर काही कारणास्तव वंगण वापरावे लागत असल्यास, के वाय जेली जी मेडिकलमध्ये मिळते (पाणी व ग्लिसरिनने बनवलेली असते) ती वापरा, तेल नाही.