गर्भ धारणा

730
रोहीत asked 10 months ago

जर पाळी महिन्याच्या 15 किंवा 1 6     येत असेलतर गर्भ धारणेसाठी योग्य काळ कोणता

1 Answers
let's talk sexuality answered 10 months ago

प्रत्येकीच्या पाळीचे चक्र वेगवेगळे असते. तुमचे चक्र किती दिवसांचे आहे याचा पहिले आढावा घ्या.

साधारणत: पाळी यायच्या १५ ते १६ दिवस आधी अंडोत्सर्जन होते. पाळीचक्र नियमित असल्यास हा काळ तुम्ही शोधू शकता. अंडोत्सर्जन होण्याच्या आधी आणि नंतरचे ३-४ दिवस हा काळ गर्भधारणा होण्यासाठी सर्वात चांगला काळ मानला जातो.

सामान्यतः ३० दिवसांच्या पाळी चक्रात पाळी संपल्यानंतर साधारणत: (दरवेळी असेच होईल असे नाही) १२ ते १४ व्या दिवसांच्या काळात अंडोत्सर्जन होते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पाळीचक्रातला अंडोत्सर्जनाचा काळ ओळखता आला तर त्यानुसार गर्भधारणेसाठी प्रयत्न करू शकता.

गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घेण्यासाठी https://letstalksexuality.com/conception/ या लिंक वरील लेख वाचा.

तसेच तुम्ही ही स्वत:च्या काही निरिक्षणाने अंडोत्सर्जन कधी होते हे जाणून घेऊ शकता. अधिक माहितीसाठी सोबत लिंक देत आहोत.

https://letstalksexuality.com/fertility-signs/

https://letstalksexuality.com/fertility-signs-2/

https://letstalksexuality.com/changes-in-cervix-in-fertility-cycle/

https://letstalksexuality.com/fertility-cycle-changes-in-the-body/

https://letstalksexuality.com/menstruation-notes/

https://letstalksexuality.com/fertility-and-sexuality-awareness/