चुकीचे हस्तमैथुन मुळे तोटे

510
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsचुकीचे हस्तमैथुन मुळे तोटे

मीमी दहावीत असताना हस्तमैथुन करत असताना वीर्य बाहेर यायची तर मी लिंगाचे समोरची त्वचा लिंगचे शिद्रे समोरच्या त्वच्याने दाबुन धरून वीर्य बाहेर येऊ दिले नाही.विर्याच्या प्रेशर ने माझे समोरची त्वचा तुटून त्याच्यामुळे माझे समोरची कातडी मागे गेली. त्यांच्या त्याच्यानंतर माझ्या अंडाशया आणि लिंगामध्ये शिरा दुखतात. लिंगाची वरची त्वचा निस्तेज वाटते. मी सेक्स करू शकत नाही कारण ती परिपूर्ण लिंग ताठ होत नाही आणि तेव्हाच फेल होते. मला लघवी पिवळी आणि जळजळ होते.असे वाटते की लघवी परिपूर्ण होत नाही. आता त्याला ५ ते ६ वर्ष झाली आहे. तब्बेत पण दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, हस्तमैथुन मुळे माझ्या लिंगाला काय प्रॉब्लेम झालेला असू शकतो.आणि त्याच्यावर काय उपचार करावे?

1 Answers
let's talk sexuality answered 1 month ago

तुम्ही लिहिल्याप्रमाणे आधी जे घडले त्याचा व सध्या जे घडत आहे त्याचा संबंध लावणे जरा घाईचे वाटते आहे. लिंग पूर्ण ताठ होत नसेल तर त्यामागे मानसिक कारण वा काही शारीरिक कारणे असू शकतात. लघवीला जळजळ होणे, पूर्ण न होणे हे इन्फेकशन मुळे ही होऊ शकते. नक्की कारण काय आहे हे समजण्यासाठी आम्हाला असं वाटतं आहे की, तुम्ही डॉक्टरांना भेटून घ्यावं.