प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsचुलती बरोबर सेक्स करू शकतो का ?

नमस्कार माझी एक चुलती आहे आणि ती दिसायला पण खूप सुंदर आहे ती सेक्सी पण आहे ती आणि मी बरीच वेळा सेक्स या विषयावर बोललो आहे ती माझ्या बरोबर सेक्स करायला तयार आहे तिचे वय 45 आहे तर मी तिच्याबरोबर सेक्स करू का  माझे वय 25 आहे

1 उत्तर

तुमच्या प्रश्नाला आणि परिस्थितीला अनेक पैलू आहेत. खरं तर हा एकाच वेळी तुमचा दोघांचा एक-एकट्याचा,  वैयक्तिक आणि त्याच वेळी दोघांनी मिळून घ्यायचा असा निर्णय असणार आहे. मला नाही वाटत तिसरी कोणी व्यक्ती या विषयात मत देऊ शकते. तुम्ही दोघंही सज्ञान आणि प्रौढ आहात हे वयावरून दिसते आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच्या स्थितीतही तुम्ही असाल कदाचित.
त्या तुमच्या काकू आहेत म्हणजे त्या विवाहित आहेत, तुम्ही तुमच्या वैवाहिक स्थिती विषयी काही लिहिलेले नाही. उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात. ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. तुमची व तुमच्या काकूंची ते स्वतःच तसे स्वीकारण्याची तयारी आहे का?
तुम्ही दोघंही वेगवेगळ्या कुटुंबाचा भाग आहात असं दिसतं आहे आणि कदाचित तुम्ही आपापल्या कुटुंबाप्रति जबाबदारही असाल. अशा गोष्टीचं काय करायचं, जबाबदाऱ्या पेलायच्या की त्याचं ओझं फेकून द्यायचं असे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. एक मात्र खरं, जर आपण जाणतेपणी, स्वतःहून काही स्वीकारलं असेल तर ते निभावणं किंवा त्याचा तार्किक आणि संवेदनशील समारोप करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट परिस्थितीने अथवा आणि कोणी लादली असेल तरी. असो.
फार तत्विकतेत न जाता एवढंच म्हणेन कि निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका. कारण बहुतेक वेळेस पुरुषासाठी हे सोपं असू शकतं, बाईसाठी नाही…
लैंगिकता एक असा प्रांत आहे की जेथे सहसा इतरांच्या वर्तनाला जज करण्याचा अधिकार प्रत्येकाने घेतलेला असतो, स्वतःच्या सोडून…

 

आवाहन

तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने काही प्रमाणात तरी तुमचे शंका निरसन झाले असावे अशी आशा आहे. मानवी लैंगिकतेचे अनेकानेक पैलू समजून घेता यावे आणि लैंगिकतेशी संबंधित कुठल्याही शंकेला अथवा प्रश्नाला व्यक्त करता यावं, प्रश्नांना वैज्ञानिक आणि संवेदनशील उत्तरं मिळावीत याच उद्देशाने ही वेबसाईट आम्ही चालू केली आहे. एका वर्षातच आपल्या या वेबसाईटला २ लाखापेक्षा अधिक ‘हिट्स’ मिळाल्या आहेत. शिवाय आपल्या ‘प्रशउत्तरे’ या मंचावर रोज दोन ते तीन प्रश्न विचारले जातात. प्रश्नकर्त्याविषयीची गोपनीयता हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आपली वेबसाईट लोकप्रिय असण्या मागचे प्रमुख कारण आहे.

 

तुम्हाला आमचा प्रयत्न उपयोगी वाटतो का? तुम्ही या वेबसाईटबद्दल इतरांना सांगाल का? ही वेबसाईट आणखी चांगली कशी करता येईल? काय नाही आवडलं? या आणि अशा मुद्यांवर तुम्हाला आमच्याशी बोलायला आवडेल का? प्लीज तुम्ही आम्हाला लिहून कळवा किंवा मोबाईलचा वापर करून आपलं मत ऑडिओ किंवा व्हिडीओ रुपात रेकॉर्ड करून आम्हाला पाठवू शकता. तुमची ओळख गोपनीय राखली जाईल ही खात्री बाळगा. आपले बहुमूल्य मत आम्हाला tathapi@gmail.com या ई मेल वर अथवा या 9545555670 व्हाट्स अप क्रमांकावर जरूर पाठवा.
 

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 1 =