प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsजर पाळी नेहमी वेळेवर येत असेल पण अचानक 10 दिवस उशीर होतो का?
1 उत्तर

मासिक पाळीवर शरीरातल्या अनेक घटकांचा प्रभाव पडत असतो. जर तुम्ही आजारी असाल, काही औषधं घेत असाल, खूप प्रवास किंवा दगदग चालू असेल, तुमच्या नेहमीच्या रुटीनमध्ये अचानक बदल झाले असतील, मनावर प्रचंड ताण असेल तर त्याचा परिणाम मासिक पाळी चक्रावर होतो. अंडोत्सर्जन लांबलं तर पाळी पुढे जाऊ शकते. 
अंडोत्सर्जनाच्या काळात लैंगिक संबंध आले असतील, कोणतंही गर्भनिरोधक वापरलं नसेल तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. तशी शक्यता वाटत असेल तर वेळीच गरोदरपणाची तपासणी करून घ्या.
मासिक पाळी चक्राची माहिती घेण्यासाठी पुढील लेख पहा. 
https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 5 =