प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsजर लिंगावरची त्वचा मागे जात नसेल तर काय करावे? हाताने मागे घेतली तर चालते का?

जर लिंगावरची त्वचा मागे जात नसेल तर काय करावे. हाताने मागे घेतली तर चालते का?

1 उत्तर
Answer for लंड त्वचा answered 10 years ago

लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही.   तुम्ही विचारले आहे की लिंगावरील त्वचा हाताने मागे घेतली तर चालते का? हे खरंतर शिस्नमुंडावरची त्वचा कितपत आवळलेली/टाईट यावर अवलंबून असेल. हाताने मागे घेऊन इजा होण्याची शक्यता आहे का? याबाबत योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणे जास्त योग्य असेल.  (फायमॉसिसची माहिती ‘मानवी लैंगिकता’ या बिंदू माधव खिरे यांच्या पुस्तकातून साभार)

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 16 =