प्रश्नोत्तरेजांघेतले, आणि मांडीच्या आतल्या भागातील केस कसे remove krayche

1 उत्तर

लैंगिक अवयव आणि लैंगिक अवयवांच्या आजूबाजूची त्वचा अतिशय संवेदनशील असते त्यामुळे त्या भागातील केस काढताना काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. बाजारात अनेक हेअर रीमूविंग क्रीम मिळतात ज्यांचा वापर करून केस काढता येऊ शकतात. परंतु अशा क्रीम्सच्या अतिरिक्त आणि सततच्या वापराने त्वचेचे आजार होण्याची शक्यताही असते. त्यामुळे शक्यतो त्यांचा सतत वापर टाळा. शेविंग क्रीम आणि रेजरने देखील केस काढता येऊ शकतात परंतु त्यात जखम होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांचा वापर करताना काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. रेझरचा वापर शक्यतो टाळा कारण त्वचेला इजा होऊ शकते. रेजर वापरणार असल्यास त्याचे व्यवस्थित निर्जंतुकीकरण केले असल्याची खात्री करून घ्या. केस काढल्यानंतर आफ्टरशेव लोशनचा वापर टाळा. त्या ऐवजी गरम पाण्यात लोशन घालून केस काढलेली जागा व्यवस्थित पुसून घ्या.

लैंगिक अवयवांची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी पूर्ण शेविंगची किंवा सगळे केस काढून टाकण्याची गरज नाही. लैंगिक अवयवांवरची त्वचा अतिशय नाजूक असते आणि त्यामुळेच अवयवांच्या रक्षणासाठी तिथे केस असतात. कात्रीचा वापर करून केस बारीक कापता येतात. रोज अंघोळीच्या वेळी लैंगिक अवयव साफ करा. जास्त उग्र वासाच्या साबणांचा वापर टाळा. त्यानेही त्वचेचे विकार होऊ शकतात. मुलींनी योनीमार्गाच्या आसपास डिओ किंवा इतर परफ्यूमचा, उग्र वासाच्या पावडरचा वापर टाळावा. त्यातील रसायनांचा जननसंस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतो.

आतले कपडे घाम टिपून घेतील असे सुती असावेत. रोजचे रोज बदलावे. आणि धुऊन कोरडे करावे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 0 =