प्रश्नोत्तरेCategory: Private Questionजास्त हस्तमैथुना मुळे मिशा एत नाहीत का माझे वय 18 वर्षे आहे
1 उत्तर

हस्तमैथुनाचा आणि मिशा येण्य़ाचा काही संबंध नाही. मुलग्यांना चेहऱ्यावर मिशा आणि दाढी किंवा छातीवर आणि एकूणच अंगावर केस असण्यासाठी एक विशिष्ट संप्रेरक कारणीभूत असतं. त्याचं नाव आहे टेस्टेस्टेरॉन. अर्थात ह्या संप्रेरकाच्या अस्तित्वामुळेच पुरुष स्त्रियांपासून वेगळे दिसतात आणि असतात. ह्या आणि अशा इतर काही संप्रेरकांच्या प्रभावमुळेच मुलांमध्ये वयात येण्याची प्रक्रिया सुरु होते. म्हणजे मुलग्यांच्या बीजकोशात पुरुष बीज आणि वीर्य कोशात वीर्य निर्मितीसोबतच तोंडावर, छातीवर आणि जांघांमध्ये केस येणे, आवाजातील बदल, स्नायूंचा विकास इत्यादी सर्व बदल ह्या संप्रेरकांच्या प्रभावातूनच होतात.

आणखीन काही महत्वाचं. “दाढी-मिशा आल्या तरच तुम्ही पुरुष असू शकता” हा समज तुमच्या डोक्यात असेल तर लगेच काढून टाका. मिशा न आल्यामुळं तुमच्या लैंगिक आयुष्यावर काहीही परिणाम होणार नाही.

यानंतरही तुम्हाला असं वाटतं असेल की मिशा यायलाच हव्या तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उचित. ते तुम्हाला योय मार्गदर्शन करतील.

I सोच replied 8 years ago

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.com/lets-soch-ek-naya-nazaria/

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 3 =