तसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे

171
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsतसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे
A asked 2 weeks ago

सर माझा प्रश्न असा आहे की समजा आपण मुलींच्या योनीला स्पर्श करून त्यांचं पाणी काढल किंवा त्यांना जे सुख हवं आहे ते दिलं म्हणजे फक्त हाताने योनीला स्पर्श करून आणि मुलीने आपल लिंग तोंडात घेतल तर शरीरातील हार्मोन चा समतोल थोडा बिघडून पाळी पुढे जाऊ शकते का किंवा ज्यावेळी आपण एकमेकांच्या लैंगिक अवयवांना हात लावतो ते हात योनीला तसेच लागल्यावर प्रेग्नंट होऊ शकत का..(हे सर्व सर खूप दिवसातून झाल असेल म्हणजे खूप दिवसातून भेट झाल्यावर) आणि लिंगातून पूर्ण वीर्य बाहेर काढले नाही फक्त जे आधी ओल ओल होत पाणी बाहेर येत तेवढ्या पर्यंतच लिंगाला हात लावला आहे नाहीतर तसा डायरेक्ट योनीचा आणि लिंगाचा संबंध नाही आणि पाळी लांबली आहे एक आठवड्याने मार्गदर्शन करावे..

1 Answers
let's talk sexuality answered 2 weeks ago

विर्यपतनाच्या आधी पुरुषाच्या लिंगातून जो पाण्यासारखा दिसणारा चिकट स्त्राव येतो त्याला precum असे म्हणतात, त्यामध्ये पुरुष बीजे असण्याची शक्यता असते. जर हाताला precum लागले व नंतर हाताचा योनीला स्पर्श झाला तर, अश्या प्रकारे गर्भधारणा होण्याची शक्यता फार कमी असते. पण गर्भधारणा होणारच नाही असे मात्र म्हणता येणार नाही. तेव्हा गर्भधारणा झाली की नाही याची खात्री करुन घ्यायची असल्यास Pregnancy kit/ test वापरून गर्भधारणेची चाचणी करता येते ती करुन घ्यावी. हे किट कोणत्याही मेडीकल शॉप मध्ये मिळते.

तसेच हे ही लक्षात घ्या की, गर्भधारणेव्यतिरिक्त पाळी लांबण्याची अनेक कारणे ही आहेत. जसे की ताण-तणाव (इतर ताणासोबतच बहुधा काही लैंगिक कृती झाल्यावर गर्भधारणा होईल की काय याचाही ताण असू शकतो), विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ, वजन कमी असणे, अत्याधिक व्यायाम, खूप कष्टाची कामे, अत्याधिक प्रवास, कुपोषण किंवा स्त्रीच्या शरीरात बीज निर्मिती आणि पाळीचक्रावर प्रभाव टाकणाऱ्या काही विशिष्ट संप्रेरकांशी (हार्मोन्स) संबंधित समस्या अशी अनेक कारणे पाळी वेळेवर न येण्याला कारणीभूत असू शकतात.