प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsतोंडावरील पिंप्लस घालवण्यासाठी उपाय सांगा
1 उत्तर

वयात येताना शरीरातमध्ये हार्मोन्सचं प्रमाण बदलत असतं. या बदललेल्या हार्मोन्सच्या प्रमाणामुळं शरीरात विविध बदल होत असतात. जसं पुरुषांच्या अंगावर केसं येणं, आवाज बदलणं, निर्माण होणं तसंच मुलींच्या शरीरात देखील स्तन वाढायला सुरुवात होणं, मासिक पाळी चालू होणं. या अशा गोष्टी हार्मोन्सच्या बदलामुळं होतात. तसंच चेहर्यानवर पिंपल्स येणं हे देखील वयात येताना होणार्या, बदलांपैकी एक नैसर्गिक बदल आहे. चेहर्यालवर येणारे पिंपल्स काही काळाने आपोआप नष्ट होतात. यासाठी काही विशेष उपाय योजना करण्याची गरज नसते. मात्र पिंपल्स फोडल्यावर चेहर्यारवर व्रण राहण्याची शक्यता असते. त्यामुळं ते फोडू नयेत. चेहर्यारची स्वच्छता राखणं महत्वाचं असतं. बाकी चिंता करण्याचं काही कारण नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 0 =