प्रश्नोत्तरेदवाखान्यात स्त्री ला लेडीज डॉक्टर ने किंवा जेन्टस् डॉक्टर या पैकी कोणते डॉक्टर ने तपासले पाहिजे?

1 उत्तर

उत्तर सोपं आहे. हे त्या पेशंट स्त्री वर अवलंबून आहे. जर एखादी स्त्री, पुरुष डॉक्टर कडून तपासून घेण्यात कम्फर्टेबल असेल तर प्रश्न नाही. पण जर कोणाला यात सहजता वाटत नसेल, संकोच वाटत असेल तर त्या स्त्रियांना स्त्री डॉक्टरनेच तपासायला हवं.  
आता यात लक्षात घेण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे आपल्या इथे अधिकाधिक स्त्रिया, स्त्री डॉक्टरलाच प्राधान्य देतात. याला कारण म्हणजे सर्वसाधारणपणे लहानपणापासूनच स्त्रियांचे पुरुषांशी संबंधित अनुभव फार काही बरे नसतात. स्त्री-पुरुषांमधील हे अविश्वासाचे वातावरण आपल्या असुरक्षित, पितृसत्ताक/जातीय समाज व्यवस्थेचे आणि संस्कृतीचे द्योतकच आहे. हे वातावरण बदलावे म्हणूनच आमचे हे लहान प्रयत्न चालू आहेत.
दुसरे म्हणजे ज्या समाजात आपण रहात आहोत तिथे काही शहरी भाग सोडले तर स्त्री डॉक्टर उपलब्ध असण्याची शक्यता खूपच कमी असते. ग्रामीण, मुख्य सडकेपासून आत किंवा दुर्गम, जंगलाच्या, डोंगराळ भागात जिथे मुळात डॉक्टरच मिळण्याची शक्यता कमी तिथे स्त्री डॉक्टर असण्याची आशाच नाही. अशा वेळी जी कोणी व्यक्ती डॉक्टर असेल त्याने किंवा तिने किमान संवेदनशील (विशेषतः स्त्रियांच्या आजारांबद्दल) असावं ही रास्त अपेक्षा आहे. अन्यथा अनुभव काही वेगळेच असतात. सार्वजनिक आरोग्य आणि स्त्रियांच्या आरोग्याच्या क्षेत्रात काम करत असताना आलेले अनुभव आम्हाला सांगतात की, बहुतेक वेळेस स्त्रिया अनेक कारणांनी आपले खरे दुखणे डॉक्टरला सांगू शकत नाहीत. सरकारी दवाखाना असेल तर डॉक्टरला ‘वेळ’ नसल्याने एखाद्या वेदनाशामक गोळीवर त्या बाईची बोळवण केली जाते किंवा खाजगी असेल तर निरनिराळ्या तपासण्या करून बील कसं वाढेल हे पाहिलं जातं.
त्यामुळे आपण मर्यादित अर्थाने जरी म्हटलं की ज्यांना हवं असेल त्यांच्यासाठी स्त्री डॉक्टर असाव्यात तरी ही सुविधा सर्वच स्त्रियांसाठी सध्यातरी उपलब्ध नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 13 =