लग्नाला 9 महिने झाले मी रोज पूर्णपणे सेक्स करतो आम्हाला लवकर बाळ हवं आहे तरीपण बायकोला दिवस जात नाही काय करावे?
आपल्या समाजात लग्नानंतर लगेच पाळणा हलला पाहिजे असे जोडप्यांवर बंधन असते. या बंधनातून बाहेर पडा. लग्नानंतर लगेच मुल हवंय् असा अट्टाहास का? काही काळ दोघं एकमेकांसोबत घालवा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांचे चांगले मित्र व्हा. आणि मग बाळाचे नियोजन करा. कारण आपण एक जीव जन्माला घालणार असलो तरी पालक म्हणून असणारी संगोपनाची जबाबदारी महत्वाची आहे हेही लक्षात घ्या. गरोदरपण, बाळंतपण तसेच पालक म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या या सर्व गोष्टीना तुम्ही, तुमची जोडीदार तयार आहे का? का त्यांच्यावरही कुटुंबातील लोकांचा दबाव आहे ते पाहा.