प्रश्नोत्तरेदिवसा सेक्स करावा खुप वाटतो दोघांना पन एकांत जागा मिळत नाही काय करावे?

1 उत्तर

दिवसा सेक्स करण्यात काहीही गैर नाही. दोघांची इच्छा, संमती, मानसिकता आणि तयारी असेल तर सेक्सला काळ वेळाची मर्यादा नाही. सेक्स कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी, कुठे आणि कसा करावा हा सेक्स करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातील व्यक्तिगत बाब आहे. हा निर्णय सर्वस्वी सेक्स करणाऱ्या व्यक्तींचा असायला हवा. दिवस, रात्र, पौर्णिमा, अमावास्या, एकादशी आणि सोमवार यावरून सेक्स करावा का नाही हे ठरविण्यापेक्षा दोघांची संमती, मानसिक तयारी, विश्वास आहे का, नको असलेली गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजार होऊ नये म्हणून योग्य ते गर्भनिरोधक वापरले आहे का, याचा विचार करणे अधिक योग्य ठरेल.

राहिला प्रश्न एकांताचा. दिवसा काय आणि रात्री काय? आपल्याकडे एकांत मिळणं अनेकांना भेडसावणारा प्रश्न आहे. काय करणार? अशी जागा शोधणं हाच त्यावर उपाय आहे. तुम्ही तुमची, तुमच्या आसपासची परिस्थिती अधिक चांगल्याप्रकारे जाणता त्यामुळे तुम्हीच अधिक चांगल्या जागा शोधू शकाल. आणि प्रयत्न करूनही दिवसा एकांत नाहीच मिळाला तर मग रात्र आहेच.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 1 =