प्रश्नोत्तरेदोघांनाही वाटते दिवसा सेक्स करावा पण तिला डोक धुवावे लागते व घरात आई असते काही उपाय सांगा

1 उत्तर

दिवसा सेक्स करावा असे वाटणे यात काहीच गैर नाही. दोन्ही जोडीदारांची इच्छा आणि संमती असेल तर सेक्स करण्यास काळ वेळाचे कोणतेही बंधन नाही. सेक्स ही मानवाची मुलभूत गरज आहे त्यात अपवित्र असं काही नाही. समाजाने त्याला अपवित्र ठरवलं आहे. स्वच्छतेच्या सृष्टीने सेक्सनंतर लैंगिक अवयावांची स्वच्छता ठेवणे महत्वाचे आहे पण सेक्स केल्यावर स्त्रीला डोकं धुण्याची काहीच आवश्यकता नसते. डोकं धुतलं नाही तरीदेखील काहीही अडचण किंवा धोका निर्माण होत नाही. आपल्या समाजात स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही अनिष्ट प्रथा दिसून येतात. त्यातीलच ही एक. सेक्समध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही सहभागी असतात. पण डोकं धुण्याचा नियम स्त्रीसाठीच का? सेक्स केल्यावर पुरुषानी देखील डोकं धुवून अंघोळ केली पाहीजे असा नियम मात्र कुठेही दिसून येत नाही. यांसारख्या प्रथांकडे आपण डोळसपणे आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून पहिले पाहिजे.

‘घरात आई किंवा इतर कुणीतरी असते आणि त्यामुळे प्रायवसी मिळत नाही’ या अनेकांना भेडसावणाऱ्या ‘सार्वत्रिक’ प्रश्नाविषयी बोलूयात. आपल्याकडे लैंगिक संबंधांसाठी हवा तो निवांत वेळ, जागा, स्पेस आणि खाजगीपणा मिळत नाही हे खरं आहे. आता यावर उपाय काय करायचा? हे तुम्हीच जास्त चांगलं ठरवू शकता. कधी तुम्ही कुठेतरी बाहेर जा कधी तुमच्या आईला बाहेर पाठवा. काही मार्ग नाहीच सापडला तर रात्र आहेच.

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 14 =