नसबंदी asked 2 years ago

नसबंदी केली तर सेक्स करायला काय प्रॉब्लेम येतो का? परत मूल हवे असेल तर नसबंदी काढता येते का? सर माझ्या अनेक प्रश्नांची तुम्ही उत्तर दिली आहेत. मी बायकोची नसबंदी केली तर मी योनीमार्गात वीर्य सोडू शकतो का? आणि पुन्हा काही कारणास्तव नसबंदी जोडली तर मुलं होतील का?

1 उत्तर

कायमस्वरुपी गर्भनिरोधनाची पद्धत म्हणुन नसबंदी या पर्यायाकडे पाहिले जाते नसबंदीचा केल्यावर जर वीर्यस्खलन योनीमार्गात झाले तरीही गर्भधारणा होत नाही. महिलांची नसबंदी पुन्हा बदलता/उलटवता येऊ शकते, पण नसबंदी जरी उलटवली तरी मुल होण्याबाबत 100% खात्री देता येत नाही. शस्त्रक्रिया उलटावी का नाही तसेच त्यानंतर गर्भधारणा होईल का नाही हे त्या महिलेचे वय, स्वास्थ्य, पाळी जाण्याचे वय, शस्त्रक्रिया करताना झालेल्या क्रिया व त्यांना शरीरानी दिलेली प्रतिक्रिया अश्या अनेक गोष्टींवर अवलंबून आहे.
या विषयावर अजून बोलायचे असल्यास आपला आणखी एक उपक्रम आहे नेस्टस् फॉर युथ. इथे तुम्ही या प्रश्नावर बोलू शकाल. 9561744883 या नंबरच्या व्हाट्सअपवर मेसेज करुन वेळ ठरवून मोकळेपणाने बोलता येईल. हा उपक्रम संपुर्णतः गोपनीय आणि नि:शुल्क आहे

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 14 =