प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपत्नीची उत्तेजना

माझी सेक्स करण्याची इच्छा आहे पण माझ्या पत्नीला उत्तेजना होत नाही किंवा ती सेक्ससाठी तयार होत नाही काय करु?

1 उत्तर

लैंगिक इच्छा आणि प्रत्यक्षात सेक्स यामध्ये बराच फरक आहे. कधी कधी लैंगिक इच्छा निर्माण होते मात्र संबंधांबद्दल काही कारणाने मनात भीती असते, अनिच्छा असते. कधी कधी सेक्सचा अनुभव जर वेदनादायी असेल किंवा जबरदस्ती झाली असेल तरी सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते. कामाच्या जबाबदाऱ्या, एकांत नसणं, इतर कुठल्या कारणामुळे मनावर ताण असेल तरी त्याचा परिणाम लैंगिक इच्छेवर आणि संबंध ठेवण्याच्या इच्छेवर होऊ शकतो. त्याही गोष्टी लक्षात घ्या. अनेकदा स्त्रियांवरती असणाऱ्या अशा सगळ्या जबाबदाऱ्या, त्याचे ताण, दमणूक अशा गोष्टी लक्षातच घेतल्या जात नाहीत. त्याबद्दल त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायला पाहिजे.
लैंगिक इच्छा आणि उत्तेजना या दोन्ही मेंदूतून नियंत्रित होतात. लैंगिक सुखाची शारीरिक व भावनिक अनुभूतीही मेंदू करतो. प्रत्येकाच्या मेंदूची जडण-घडण वेगळी असल्यामुळे प्रत्येकाचा लैंगिक अनुभव हा स्वतंत्र असतो. संभोगातून कोणाला किती लैंगिक सुख मिळतं याची तुलना करता येत नाही. म्हणूनच संभोग हा दोन पायांमध्ये नसून तो दोन कानांमध्ये आहे असं म्हटलं जातं.
प्रत्येक व्यक्तीला सारख्याच प्रमाणात सेक्स करावंसं वाटतं असंही नाही. काही जणांना जास्त इच्छा होते तर काहींना कमी. पण त्यामध्ये समतोल साधणं आणि एकमेकांवर जबरदस्ती न करता लैंगिक संबंधांचा मध्यमार्ग शोधून काढणं यात महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्हाला जमेल अशी आशा आहे. लग्नाचं नातं सेक्सशिवाय इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. त्यामुळे बाकी गोष्टींचाही विचार करा. आणि त्या नीट असतील, एकमेकांशी संवाद असेल आणि मुळात प्रेम असेल तर तुम्हाला नक्की मार्ग सापडेल.
ऑल द बेस्ट!!!

आपले उत्तर प्रविष्ट करा

1 + 13 =