प्रश्नोत्तरेपत्नी पूर्वीसारखी साथ देत नाही

mhazya patnila sex kelyavar yonicya thikani tras hoto pan pur putvi ase navate  tyamule to aata mala sad det nahi aamche vay aata40 te 48 aahevi

1 उत्तर

आपणाला माहितच आहे की साधारणपणे स्त्रीला १२ वर्षानंतर मासिक पाळी येते आणि ४० ते ४५ वर्षापर्यंत ती सुरु रहाते. मासिक पाळी जाण्याच्या कालखंडाला ‘मेनोपॉज/रजोनिवृत्ति’ असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे मुलगी वयात आली कि शारीरिक व मानसिक बदल होतात त्याचप्रमाणे मेनोपॉजच्या काळात बदल जसे चिडचिड होणे, नैराश्य, विसरायला होण, अचानक दरदरून घाम सुटणे, लघवीचे त्रास संभवणे, संभोगाची इच्छा कमी होणे व त्यात त्रास जाणवणे अशी लक्षणं दिसून येतात. याचे कारण आहे याकाळात शरीरातील इस्ट्रोजन या द्रवाचे प्रमाण कमी होत असते. आपल्या जोडीदाराचे वय लक्षात घेता त्या मेनोपॉज या अवस्थेतून जात आहेत. यामुळे शरीर संबंध ठेवताना त्यांना त्रास होत असावा. ज्यामुळे प्रतिसाद देण्यास त्यांना अडचण येत असावी. आपण हे ही समजून घेतले पाहिजे की, इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे जननमार्गाचा रक्तपुरवठा कमी होतो. ज्यामुळे योनी मार्ग कोरडा व अरुंद अरुंद होतो. परिणामतः स्त्री पुरुष संबंध थोडे त्रासदायक वाटण्याचा संभव आहे. यामुळे लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी जास्त वेळ उद्दीपन किंवा फोर-प्ले करणे गरजेचे आहे.
लैंगिक संबंधात योनीमार्गाचा शुष्कपणा त्रासदायक ठरू नये म्हणून डॉक्टर्स वंगणयुक्त के –वाय जेली सुचवतात. आपणही डॉक्टरांचा सल्ला घेवून कोणती जेली वापरावी हे ठरवू शकता. सहजीवनाचे एक अंग समागम आहे. मात्र यासाठी गरज आहे ऐकमेकांशी बोलण्याची, वाढत्या वयात होणाऱ्या बदलांना (शारीरिक आणि मानसिक) समजून घेण्याची आणि योग्य प्रतिसादाची.

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 4 =