प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपहिली वेळा सम्भोग करुण झाल्यावर चालान्यामधे फरक पडतो का? चालताना प्रायवेट पार्ट मध्ये दुखते का?
1 उत्तर

पहिल्यांदा किंवा कधीही केलेल्या संभोगानंतर चालण्यामध्ये फरक पडतोच असं अजिबात नाही. कोणाच्याही चालण्याच्या पध्दतीवरुन संभोग केला आहे की नाही हे सांगणं कठीण आहे. पायाला किंवा पोटाच्या दुखापतीमुळंही चालण्याची ढब बदलू शकते. पहिल्या संभोगानंतर लैंगिक अवयवांमध्ये दुखेलच असंही नाही. पहिल्यांदा किंवा कधीही कशा पद्धतीनं संभोग करता यावरुन दुखण्याची शक्यता निर्माण होवू शकते. परंतू सगळ्यांच्या होईल असंदेखील नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 2 =