प्रश्नोत्तरेपाळीस स्लॅक घातल्यावर काय होईल

1 उत्तर

तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय का ? वाटत असेल, मग नो प्रॉब्लेम. बिनधास्त वापर. नसेल कम्फर्टेबल वाटत तर नाही वापरलं तरी चालेल. मासिक पाळीच्या काळात स्वच्छता ठेवणं मात्र महत्वाचं. खालील काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेव.

• मासिक पाळीचे रक्त शोषण्यासाठी नेहमी स्वच्छ सॅनिटरी पॅड/कापड वापरावे.

• ज्या भागात पाण्याची कमतरता आहे आणि कापड धुण्यास पुरेसे पाणी उपलब्ध नाही अशा ठिकाणी सॅनिटरी पॅड वापरणे अधिक चांगले.

• दुर्गंधी व संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटरी पॅड किंवा कापड नियमितपणाने (किमान ४-५ तासांनी) बदलले पाहिजे.

• कापड वापरानंतर पुन्हा धुवून उपयोगात आणायचे असल्यास ते स्वच्छ धुवून सूर्यप्रकाशात वाळवून निर्जंतुक कारणे आवश्यक असते. ओलसर, दमट कपडयात जंतू वेगाने वाढतात आणि जंतु लागण होऊ शकते.

• मासिक पाळीच्या काळात जननेंद्रियांची आणि संपूर्ण शरीराची स्वच्छता ठेवावी. उदा. दररोज अंघोळ करणे, नियमित कापड/ सॅनिटरी पॅड बदलणे.

• वापरलेले सॅनिटरी पॅड व्यवस्थित कागदात गुंडाळून कचरापेटीत टाकणे किंवा जाळून टाकणे.

मासिक पाळीच्या काळात योग्य ती काळजी व स्वच्छता न ठेवल्यास योनीमार्गात जंतूलागण होऊन प्रजनन मार्गाचे काही संसर्गजन्य आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी या काळात स्वच्छता ठेवावी. अंगावरून नेहमीपेक्षा जास्त अंगावरून जाणे, अंगावरून पांढरे जाणे, योनीला खाज सुटणे, आंबट वास असणारे पांढरे अंगावरून जाणे, लघवी करताना जळजळ होणे, लैंगिक संबंधांच्या वेळेस वेदना होणे, अंग बाहेर येणे अशा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 17 =