प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाळी असल्यास सेक्स केल्यास धोका संभवतो का
1 उत्तर

मासिक पाळीच्या काळात संभोग करण्यात गैर, चुकीचं किंवा पाप असं काही नाही. मात्र खालील गोष्टी माहित असणं आवश्यक आहे.

१) मासिक पाळीच्या काळातील रक्त अशुध्द/अपवित्र असं नक्कीच नसतं मात्र त्यातून जंतूसंसर्ग किंवा लिंगसार्सर्गिक आजारा होण्याचा धोका जास्त असतो. यासाठी कंडोमचा वापर करणं फायदेशीर राहतं.

२) मासिक पाळीच्या काळात हार्मोन्सच्या बदलामुळं स्त्रियांमध्ये लैंगिक उत्तेजना जास्त दिसून येऊ शकते.

३) मासिक पाळीच्या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी असते. जर मासिक मासिक पाळी चक्र कमी दिवसांचं असेल तर गर्भधारणा होऊ शकते.

हे लक्षात ठेवा, मासिक पाळीच्या काळात किंवा इतर कोणत्याही वेळी संभोग करताना त्या स्त्रीची परवानगी असणं फार आवश्यक आहे. कोणतीही शारीरिक आणि मानसिक जबरदस्ती न करता केलेला संभोग हा दोघानांही आनंद देणारा असतो.

आपले उत्तर प्रविष्ट करा

13 + 10 =