प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाळी झाल्यावर पोटात खूप कळा का येतात आणी कंबर पन खुप का दुखते..

पाळी झाल्यावर पोटात खूप कळा का येतात आणी कंबर पन खुप का दुखते..पाळी झाल्यावर पोटात खूप कळा का येतात आणी कंबर पन खुप का दुखते..

1 उत्तर

बाईला पाळी येणं ही श्वसन, पचन किंवा रक्ताभिसरणासारखीच एक अत्यंत नैसर्गिक अशी क्रिया आहे. ती घाण नाही, अपवित्र नाही आणि तिचा इतरांवर कसलाही परिणाम होत नाही. काहीजणींना पाळीच्या काळात ओटीपोटात दुखणे, कंबर दुखणे किंवा पाय दुखणे यांसारखा त्रास होतो. चालणे किंवा एखादा दुसरा हलका व्यायाम केला तर स्नायूंना आराम मिळतो. वेदना थांबवण्यासाठी शेकही घेऊ शकता. पाळीतील वेदना सहन न करता त्यावर काही उपाय करायला हवा. खालील काही घरगुती उपाय करता येतील.

  • गरम पाण्याची पिशवी कमरेखाली घ्यावी.
  • आले घालून चहा प्यावा. एक कप चहात अंगठ्याएवढे आले घालावे.
  • चिंचोक्याइतका चुना व त्यात दुप्पट गूळ घालून गोळी तुपातून किंवा ताकातून घ्यावी.
  • बऱ्याच वेळा बद्धकोष्ठतेमुळे पोटात दुखू शकते. त्यासाठी पाळीच्या आधी भरपूर पाणी व तंतुमय पदार्थांचा उपयोग करून बद्धकोष्ठता टाळावी.

घरगुती उपायांनी जर आराम पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. फक्त पोटात दुखतंय किंवा कंबर दुखतेय असं सांगून औषध घेतलं तर कदाचित त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे पाळीच्या काळात किंवा पाळी आल्यामुळे वेदना होत आहेत हे खरं कारण मोकळेपणाने डॉक्टरांना सांगा.  

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 7 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी