प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाळी नंतर किती दिवसांनी सम्भोग केल्यास कन्या रत्न प्राप्त होईल

1 उत्तर

विज्ञान असे काही उत्तर देत नाही. मुलगी किंवा मुलगा होणं हे स्त्री आणि पुरुष बिजातील गुणसूत्र ठरवतात. त्यावर कोणाचे नियंत्रण नसते. ना आयुर्वेदाचे ना कुठल्या बाबाबुवाचे. बाळाची आस असणे, मुलगी हवी असे वाटणे काही वाईट नाही पण त्यासाठी निसर्गाच्या कामात हस्तक्षेप कशाला? मुलगाच हवा हा हट्ट जसा चुकीचा तसा मुलगीच हवी हा अट्टहासही नको.

आजकाल विज्ञानाचा आधार घेऊन काही नफेखोर कंपन्या आणि डॉक्टर मंडळी निसर्गाच्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलगाच हवा आणि मुलगी नको ही जुनाट आणि भोंगळ मानसिकता, विज्ञानाने लावलेल्या शोधांचा प्रतिगामी मुल्ये जपण्यासाठी आणि निव्वळ कमाईसाठी गैरवापर करून घेते. परंतु अशा प्रयत्नांचा बिमोड करण्यासाठी प्रशासन, कायदा आणि आपण समाजानेसुद्धा कंबर कसायची आवश्यकता आहे. आपण त्याला बळी नको पडायला.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 3 =