पावर asked 5 years ago

सेक्स पावर वाढवण्यासाठी काय खावे

1 उत्तर
Answer for पावर answered 5 years ago

सेक्स पावर किंवा stamina बद्दल तुमच्या मनात काही गैरसमज असेल किंवा न्यूनगंड असेल तर तो काढून टाका. मुळात सेक्स पावर का वाढवायची ? जर जास्त वेळ संभोग केला म्हणजे जास्त आनंद मिळतो हा आपल्या समाजात सर्रास आढळणारा गैरसमज तुम्हालाही वाटत असेल तर याकडे जास्त लक्ष देऊ नका. कारण तुम्हाला व तुमच्या जोडीदाराला वाटेल तेव्हा एकमेकांच्या संमतीने हवा तेवढाच संभोग करणं हे महत्वाचे आहे. लोक सांगतात म्हणून किंवा त्यांच्या नजरेत मोठं होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ संभोग करण्याची खरं तर काही गरज नसते. सेक्स ही एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. यामध्ये जोडीदाराबरोबर योग्य तो संवाद होणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांची शरीरं, एकमेकांच्या लैंगिक इच्छा, अपेक्षा समजून घेणं खूप महत्वाचं असतं. ही काही स्पर्धा नाही आहे. एकमेकांना आनंद देणं व घेणं यातच संभोग आला. तेव्हा आनंदी राहा, सुखी राहा.

सोबत काही लिंक देत आहोत, त्या नक्की वाचा.

https://letstalksexuality.com/sexual-health/

https://letstalksexuality.com/sexual-pleasure/

https://letstalksexuality.com/foreplay/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 2 =