प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपाॅर्न फिल्ममधील लोकांच लिंग कस मोठ असत?त्यामूळेच अापल लिंगपण तस असाव अस वाटतहे कितपत खर अाहे ?

1 उत्तर

लिंगाची लांबी, आकार याबद्दल पुरुषांमध्ये अनेक गैरसमज दिसून येतात. बऱ्याचदा पोर्न फिल्ममध्ये लैंगिक अवयव, सेक्स विषयीचे जे काही वर्णन केलेलं असतं किंवा दाखवलं जात तेच आकर्षक आणि खरं वाटायला लागतं. त्यामुळे स्वतःची पोर्न फिल्म मध्ये दाखवलेल्या लैंगिक कृतींशी आणि व्यक्तींबरोबर तुलना व्हायला लागते. यातून मनामध्ये केवळ न्यूनगंड तयार व्हायला लागतात. त्यामध्ये दाखवलेली प्रत्येक लैंगिक कृती ही खरी किंवा वास्तविकतेला धरून असतेच असे नाही. शेवटी ती एक फिल्म आहे. यातून काय घ्यायचं किंवा काय नाही हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. लिंगाचा आकार मोठा म्हणजे लैंगिक सुख किंवा आनंद जास्त असं पुरुषांना वाटतं…परंतू यामध्ये काही तथ्य नाही. लैंगिक संबंध सुखकारक होणे गरजेचे असते.

“लक्षात ठेवा आकार नाही तर आनंद महत्वाचा.” अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/?s=%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8+

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 20 =