प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपुरुषांच्या गुप्तांगामधील खाज

महोदय,

मी 19 वर्षीय मुलगा आहे, माझ्यागुप्तांगमध्ये      नेहेमी   खाज येते, ती खाज तेथील केसकापल्यामुले होते का?   आणि हि खाज बंद करण्या साठी काही उपाय मला। कळवा

1 उत्तर

लैंगिक अवयवांजवळ खाज येण्याची अनेक कारणं असू शकतात. जसं लैंगिक अवयवांची आणि शरीराची स्वच्छता न ठेवल्याने देखील खाज येवू शकते. अनेकवेळा आंघोळीनंतर लैंगिक अवयवांजवळील भाग ओलसर राहिल्यामुळे देखील अशी खाज येवू शकते. यासाठी लैंगिक अवयवांभोवती स्वच्छ आणि कोरडं वातावरण असेल याची काळजी घ्यावी. याव्यतिरीक्त काही कारणामुळं खाज येत असेल तर त्वचारोग निदान करणार्‍या कोणत्याही डॉक्टरांना सल्ला घेणं जास्त फायदेशीर राहिल. केस कापल्यामुळे खाज येत नाही. केस कापताना मात्र काळजी घेणं आवश्यक आहे. जसं ज्या वस्तूने केस कापणार आहात ती स्वच्छ असणं आणि कोणतीही इजा न होता केस कापणं महत्वाचं आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

8 + 14 =