प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपुरुष पुरुष सेक्स करु शकतात का..?व त्याचे परिणाम काय

1 उत्तर

होय. समलिंगी पुरुष दुसऱ्या समलिंगी पुरुषांशी सेक्स करतात. ते मुखमैथुन, गुदमैथुन, हस्तमैथुन, एकमेकांच्या शरीराला कुरवाळणे, कीस करणे याप्रकारे सेक्स करू शकतात. सेक्स करताना खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे:

१. दोघेही प्रौढ असावेत

२. परस्पर संमती

३. खाजगीमध्ये सेक्स व लैंगिक क्रिया करणे

४. मुखमैथुन आणि गुदमैथुन करताना कंडोमचा वापर- समोरच्या व्यक्तीला एच. आय. व्ही किंवा इतर लिंगसांसर्गिक आजार असतील तर ते होऊ नयेत म्हणून कंडोमचा वापर आवश्यक आहे.

Meghraj replied 2 years ago

मला गुदामैंथून करून घ्यायचे आहे,पण गुदाचे होल छोटे आहे,ते मोठे करण्यासाठी काय करावे..?

let's talk sexuality replied 2 years ago

गुदद्वार अश्या पेशी आणि स्नायुंपासून बनलेले आहे जे गरजेनुसार आकुंचन आणि प्रसरण पावतात.कृत्रिम रित्या त्याचा आकार अचानक वाढवता किंवा कमी करता येत नाही. तसेच गुद्द्वार योनीप्रमाणे स्वयं-स्नेहन (self lubrication) होत नाही आणि त्वचेच्या इतर भागांपेक्षा पातळ आणि अधिक संवेदनशील असते. यामुळे लैंगिक संक्रमणासह (STIs) इतर संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते.
पण गुदामैथून जास्त सहज व्हावे यासाठी काही प्रकारची उपकरणे किंवा व्यायाम करता येऊ शकतात. गुदामैथून करण्याआधी हाताची बोटं वापरून, butt plugs किंवा इतर dialatersचा वापर करून गुदाजवळील स्नायूंचा सराव करुन, भरपूर ल्युब (वंगण) वापरुन आणि सुरक्षित सेक्स (कंडोम वापरून) केल्याने मदत होऊ शकते. जर गर्भधारणा, मूळव्याध असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शेवटी जरी गुदामार्ग तात्पुरता मोठा झाला तरी शेवटी आकुंचन पावून त्या पुर्ववत स्थितीमधेच येतो याची नोंद घ्यावी.

आपले उत्तर प्रविष्ट करा

19 + 8 =