प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपॉर्न पाहणे मला खूप आवडते यात काही वाईट विकृत बुध्दिमत्ता अस काही नाही ना ?
1 उत्तर

पॉर्न क्लिप्स पाहणं चांगलं की वाईट हे प्रत्येकानं स्वतः ठरवण्याची गरज आहे. तुम्ही त्यातून कोणत्या गोष्टी शिकता हे महत्वाचं आहे. अनेकदा पॉर्न क्लिप्स या अतिरंजित लैंगिक कल्पनाच असतात. शिवाय पॉर्न क्लिप्समध्ये हिंसा दाखवणारी अनेक दृष्य असतात. यामध्ये स्त्री आणि पुरुषांना केवळ एक लैंगिक वापराच्या वस्तू अशा दृष्टीकोनातून भडकपणे दाखवलं जात. कित्येकदा पॉर्न क्लिप्समधील लैंगिक कृती पाहून तशाच कृती जोडीदाराने कराव्या अशी बळजबरी केली जाते.

पॉर्न क्लिप्स जरी लैंगिक उत्तेजना देणार्याी असल्यातरी वरील गोष्टी त्यातून बाजूला करता येत नाहीत. तेव्हा तुम्ही पॉर्न क्लिप्सला कशा पध्दतीने पाहता आणि त्यातून काय शिकता हे महत्वाचं आहे. यावर तुम्ही नक्की विचार कराल अशी अपेक्षा आहे..!

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 9 =