प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsपोर्न फिल्म्स पाहून भविष्यात तशाच प्रकारचा संभोग करावासा वाटतो: माझे वय १९ आहे मी पॉर्न फ्लिम्स पाहतो व माझा व्हाटसप वर एक ग्रुप देखील आहे ज्यावर फक्त पॉर्न फ्लिम्स व चित्र मुले पाठवत असतात

माझे वय १९ आहे मी पॉर्न फ्लिम्स पाहतो व माझा व्हाटसप वर एक ग्रुप देखील आहे ज्यावर फक्त पॉर्न फ्लिम्स व चित्र मुले पाठवत असतात मी तुमचा ‘फिक्शन अँन्ड रिअँलिटी’- निहार सप्रे तसेच पुर्वीही पॉर्न फ्लिम्स विषयक पुर्वीचेही प्रश्नोत्तरे व लेख वाचलेले आहेत

मला पॉर्न फ्लिम्स पाहून भविष्यात जोडीदारा बरोबर तशाच प्रकारचेया संबधाची अपेक्षा करायचो पन तुमचे लेख व वाचल्या नंतर माझा तसा समज दूर झाला या बद्दल मी आपला टिम चे आभार व्यक्त करतो

पन तरीही कधी कधी मला वाटते की जोडीदारा बरोबर भविष्यात तश्या प्रकारचे म्हणजे ओरल सेक्स , मुखमैथून , वगैरे वगैरे करावे

हा विचार माझ्या मनातून येत जात आसतो मी लग्ना पुर्वी सेक्स संबंध कोनाशी ही ठेऊ एच्छित नाही पन या गोष्टी मुळे मी माझ्या भविष्यात होणार्या पत्नी कडून ही अशा प्रकारची सेक्स करण्याची इच्छा ठेवत आहे मला माहीत आहे कि भविष्यात मी तिच्या इच्छे शिवाय अश्या प्रकारचे सेक्स तिच्या सोबत करू शकत नाही आणि तिला या प्रकारच्या संबधान विषयी ही विचारणे इतके सोपे वाटत नाही .

मी अजून पर्यत कोनाशीही शारिरीक संबंध ठेवलेला नाही

माझा प्रश्न असा आहे की अश्या प्रकारे शारिरीक संबध ठेवायला पत्नी मान्य होईल का ? नाही ?

आणि माझे खुप मित्र सध्या अशा प्रकारच्या संभोगा ची अपेक्षा त्याच्या गर्लफ्रेंड जवळ व भविष्यातील पत्नी जवळ ठेवतात

मी माझ्या भविष्यातील जोडीदारा कडून ओरल सेक्स , मुख मैथूनाची अपेक्षा ठेवू ? कि नको ?

आणि जर तशी अपेक्षा मी ठेवली आणि त्या प्रमाणे मला सेक्स करायला नाही मिळाले तर मला पुर्न संतुष्टी नॉर्मल सेक्स द्वारे मिळेल का ?

विचारण्याचा उद्देश असा वाटतो कि माझ्या बरोबर माझ्या भविष्यातील जोडीदाराने देखील तश्या प्रकारचा संभोगाचा आनंद घ्यावा

हे अस होने कितपत शक्य आहे ? आणि अशा प्रकारची अपेक्षा ठेऊ कि नको हे सांगा ?

1 उत्तर

तुम्ही म्हटल्याप्रमाणे आधीची काही प्रश्नोत्तरे आणि लेख वाचल्यामुळं तुमच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल झाले आहेत. हे वाचून वेबसाईटचा उद्देश सफल होताना दिसतोय. तुम्ही नियमित वेबसाईट वाचता हे वाचून आनंद झाला.
आता प्रश्नाकडं वळू या. पॉर्न क्लिप्समधून काही लैंगिक कृती अतिरंजित दाखवल्या जातात. जसं २० ते २५ मिनिटं संभोग चालतो, प्रत्येकवेळी स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज येतो किंवा जास्तीत जास्त योनी गोर्‍या रंगाच्या आणि शेविंग केलेल्या इत्यादी. या सर्व गोष्टी प्रत्यक्षात असतील असं नाही. पॉर्न इंडस्ट्रीमध्येही तेच दाखवलं जातं ज्यातून त्यांना जास्त नफा कमवता येईल. त्यामुळं पॉर्न पहावं की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो.
संभोग करणं ही एक जबाबदार कृती आहे, याची जाणीव असणं जास्त महत्वाचं आहे. ज्या व्यक्ती लैंगिक संबंधांमध्ये सहभागी आहेत त्यांच्या संमंतीचा प्रश्न प्राथमिक असला पाहिजे. जबरदस्तीने मिळवलेली संमती ही अत्याचाराच्या प्रकारातच मोडते. याबद्दल अधिक लिहित नाही. तुम्ही नियमित वाचक असल्याने तुम्ही संमती आणि आदर याचे महत्व जाणत असालच.
आता प्रश्न राहतो की, जोडीदाराला याविषयी कसं सांगांयचं? खरतरं लैंगिकतेबद्दलच्या गप्पा, गोष्टी किंवा माहिती सांगताना त्या कशाप्रकारे आणि कोणी सांगितल्या गेल्या यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. काही लोकांना त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर लवकर विश्वास बसतो तर काहींना त्याबद्दल अधिक वाचन/अभ्यास करुन गोष्टी पटतात. काही लोकं कुतूहलापोटी गोष्टी शिकतात आणि मग आवडायला लागतात. तेव्हा तुमचा जोडीदार कसा स्वभावाचा असेल यावरुन अनेक गोष्टींचा अंदाज तुम्हाला बांधावा लागेल.
लहान वयात झालेल्या लैंगिक अत्याचारामुळं सेक्सबद्दल किंवा काही लैंगिक कृतींबद्दल किळस, तिरस्कार निर्माण होवू शकतो. लहानपणीच्या अत्याचाराला आपण जबाबदार आहोत अशी अपराधीपणाची भावना तयार होते. कदाचित कालांतराने त्याबद्दलचा तिरस्कार कमी होत जाईल. परंतू त्यांना हे आवर्जून सांगा की अशा घटनांमध्ये त्यांचा काही दोष नाही. ज्या व्यक्तींनी अत्याचार केला आहे त्या व्यक्ती आणि सामाजिक परिस्थिती जबाबदारा आहे. झालेल्या अत्याचाराबद्दल तुम्ही जर जाणीवपूर्वक मनमोकळा संवाद केला तर जोडीदाराला अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर यायला मदत होईल.
ज्या जोडीदाराशी तुम्ही लैंगिक संबंध ठेवणार आहात त्याच्या किंवा तिच्याबद्दल आधीपासून एक मोकळा संवाद असेल तर अशा गोष्टींबद्दल बोलणं सोप्प जातं. लैंगिकतेची कोणती कृती चांगली कोणती वाईट हे मित्रांपेक्षा जोडीदाराच्या संमंतीवरुन ठरवा. जोडीदाराशी मनमोकळा संवाद वाढवा, जोडीदाराच्या मतांचा आदर करा. लैंगिक कृती करणं वाईट नाही असं तुमच्या कृतीमधून जाणवू द्या.
आत्तापासून इतकी चिंता करणं सोडा, कदाचित जोडीदारालाही अशा लैंगिक कृतींचा आनंद घ्यायला आवडत असेल. आत्ताच विचार करत बसण्यापेक्षा जोडीदार आल्यावर ज्या समस्या जाणवतील त्यावर आपण वेळोवेळी गप्पा मारु या.

आपले उत्तर प्रविष्ट करा

11 + 7 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी