प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsप्रेम नाही, पण सेक्स हवाय. प्लीज मदत करा.

मी आणि माझी मैत्रीण गेली तीन वर्षं एकमेकांना ओळखतो. आम्हाला एकमेकांबद्दल आवड तर आहे, पण प्रेम वगैरे नाही, हे आम्ही बोलून घेतलेलं आहे. आमचं लग्नही काही कारणांमुळे होऊ शकणार नाही हेही आम्हाला माहित आहे. पण, आम्हाला सेक्सचा अनुभव एकदातरी घ्यायचाय, जमलं तर नंतरही. आम्ही ह्याआधी एकत्र मुखमैथुन आणि हस्तमैथुन केलेलं आहे, आणि आम्हाला आता संभोग करायचा आहे.

१. हे वाटणं योग्य आहे का?

की आम्ही एकत्र पॉर्न पाहिल्यामुळे उगीच फक्त त्यातल्या थ्रिलसाठी मनात आलेली ही एक विचित्र कल्पना आहे, हे आम्हाला कळत नाहीये. आम्हाला एकांतात असताना एकमेकांबरोबर संभोग करायची भावना त्याआधीही व्हायची, आणि आत्ताही होते.

२. मी पुरुष असून मला त्यातून होऊ शकणाऱ्या प्रॉब्लेम्सची भीती वाटते म्हणून मी अजून संभोग केला नाहीये. ह्यामुळे तिचं माझ्याबद्दलचं आकर्षण कमी होईल, तिला माझ्या पुरुषत्वावर शंका येईल अशी भीतीही वाटते.

हे सरळ तिला विचारण्याची हिम्मत माझ्यात नाही. तुमच्या साईटवरचे जवळपास सगळे लेख वाचूनही ह्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळाली नाहीत.

प्लीज मला मदत करा.

1 उत्तर

तुम्ही एकमेकांना तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखता, आवडता, एकमेकांसोबत पॉर्न एकत्र बघणे, मुखमैथुन, हस्तमैथुन यांसारख्या लैंगिक क्रियांमध्येदेखील सहभागी आहेत यामुळे लैंगिक आकर्षण वाटू शकतं. अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे ते. पण पुढे जाण्याआधि काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

सगळ्यात पहिल्यांदा मैत्रिणीशी बोलावं लागेल. तिच्या मनात देखील तशाच भावना आहेत का ? हे जाणून घ्या. तुम्ही एकमेकांसोबत लैंगिक संबंध (मुखमैथुन, हस्तमैथुन, फोर प्ले) केले असल्याने, खरंतर तिच्याशी योनिमैथुनाबद्दल बोलणं सोपं जाईल. पण पारदर्शकता हवी. दोघांनाही क्लिअर हवं, ‘ प्रेम नाही सेक्स हवाय’. नाहीतर गोची होऊ शकते. आणि हे सगळं करत असताना समोरच्या व्यक्तीची इच्छा, संमती, आदर मस्ट. जबरदस्ती चालणार नाही. कायद्याने गुन्हाच आहे तो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, सुरक्षितता. म्हणजेच, नको असलेली गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजार (लैंगिक संबंधांतून पसणारे आजार) होऊ नयेत म्हणून कंडोमचा वापर. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.

पुरुष असल्याने कोणते प्रॉब्लेम्स होतील असं तुम्हाला वाटतं ? ते जरा विस्ताराने सांगितले तर त्याविषयी चर्चा करता येईल. पण संमती, आदर, विश्वास आणि सुरक्षितता ही सूत्रं लक्षात ठेवली आणि अवलंबिली तर प्रॉब्लेम्सची शक्यता कमी होऊ शकते.

आता सगळ्यात शेवटचा प्रश्न, ‘तिला तुमच्या पुरुषत्वावर शंका येईल अशी भीतीही वाटते’ याविषयी बोलूयात. पुरुषत्व म्हणजे नेमकं काय? तुमची व्याख्या तपासून घ्या. पहिल्या लैंगिक संबंध यशस्वीरीत्या (???) पार पाडणे, म्हणजे पुरुषत्व असते का ? मित्र सेक्स काही लढाई/जंग नाही जी पहिल्या प्रयत्नातच जिंकायला हवी. त्यामुळं पुरुषत्वाचे/मर्दानगीचे काही गैरसमज तुझ्या मनात असतील तर काढून टाक. ‘स्त्रीत्व, पुरुषत्व’ यांसाख्या गोष्टी बाजूला सारून जरा माणूस म्हणून स्वतःला जाणून घेऊयात. असो.

टू कनक्लूड, जे काही कराल ते एकमेकांच्या संमतीने आणि सुरक्षितता राखून. काळजी घ्या, Be safe.

आपले उत्तर प्रविष्ट करा

15 + 14 =