प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला प्रेम विवाह करायचा आहे. मला माझ्या घरचे परवानगी देत नाहीत. मी माझ्या घरच्यांशी कसा संवाद साधू?

मला प्रेम विवाह करायचा आहे. मला माझ्या घरचे परवानगी देत नाहीत. मी माझ्या घरच्यांशी कसा संवाद साधू? जेणेकरून माझे घरचे आमच्या लग्नाला परवानगी देतील. मला माझ्या घरच्यांशी बोलायला खूप भिती वाटते?

1 उत्तर

सर्वात प्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही समस्या फक्त तुमच्याबाबत आहे असं अजिबात नाही. तुमची समस्या सामाजिक आहे आणि त्यामुळं या समस्येचं व्यक्तीगत उत्तर देणं अवघड आहे. परंतू समाजामध्ये हा विरोध का होतो हे मात्र नक्कीच समजून घेता येईल. समाजामध्ये अनेक विचारप्रवाह आहेत. लोकांनी स्वतंत्रपणे विचार करु नये यासाठी समाजातील अनेक घटक जाणून-बुजून प्रयत्न करत असतात. प्रेमविवाह हा दोन स्वतंत्र विचार करणार्‍या व्यक्तींनी घेतलेला निर्णय आहे. आणि त्यामुळे त्याला घरातून किंवा समाजातून विरोध होत असतो. प्रेमविवाह जर आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय असेल तर विरोधाची धार अधिक असते. तुम्ही दोघेही जोडीदार आर्थिकरित्या स्वतंत्र असाल तर घरातील विरोध अनेकवेळा कमी होतो. मुलांनी जर स्वतःच्या बाबतीतले निर्णय स्वतः घेतले तर पालकांचं महत्व कमी होईल किंवा म्हातारपणी सांभांळ करताना पुन्हा स्वतंत्र निर्णय घेतील अशी भिती अनेक पालकांना वाटत असते. काही पालकांना आपल्या मुलांपेक्षा समाजातील खोट्या प्रतिष्ठेची काळजी जास्त असते म्हणून ते विरोध करत असतात. अशा सर्व परिस्थितीमध्ये पालकांना विश्वासात घेवून, तुम्ही घेत असलेल्या स्वतःच्या आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली तर ते नक्की तयार होतील. विरोध पत्कारून प्रेम करायचं की नाही? हा निर्णय मात्र तुम्हालाचा घ्यावा लागेल. विरोध पत्कारुन प्रेम करण्यामध्येदेखील काहीही वाईट नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 11 =