प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsप्रेयसी- एक गोड शब्द आणि व्यक्ती

mee majhya girlfriend vr khup
prem krto( प्रेयसी म्हणने अधिक योग्य राहील) v ti pn khup!!.

mla tila yila dukhwayche nahi.

kaaran mi competitive exam cha abhyas krto.

pn nemkach abhyas krtanna ticha msg yeto
tyamule reply dyava lagto

v nantar call yeto(बहुतेक सर्वांना miss call येत असतील पण मला फोन येतो)

tyamdhe half hour tri vel jate v nantar abhyasatmn lagt nahi.

माझे करीअर पण तितकेच महत्वाचे आहे जितकी की माझ्यासाठी “ति” !!!!

mi kay kru jyamule ya problem che mla solution milel

karan mi abhyasakde durlaksh kru shakt nahi v tila pn naraj kru shkt nahi.

कारण माझे करीयर पण मला तिच्यासाठीच घडवायचे आहे,

कारण या जगात माझं “तिच्या” शिवाय कोणीच नाही
( वास्तविकता)!!!!!

1 उत्तर

प्रेयसी या शब्दाप्रमाणेच तुमचा प्रश्नही गोड आहे. प्रेमात पडल्यावर आपलं कसं काय काय होतं हे तुमच्या प्रश्नावरून कोणालाही समजेल. तुमच्या प्रश्नातच खरं तर तुमचं उत्तर दडलेलं आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, करियर घडवायचं आहे, तिच्यासाठी काही तरी करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्व ते प्रयत्न करायला तयार आहात. ही फारच चांगली गोष्ट आहे. फोन, मेसेज, प्रेयसीशी गप्पा यामध्ये वेळ जातो आणि नंतर अभ्यासात लक्ष लागत नाही. असं होतंच आणि प्रेमात पडल्याचं ते लक्षण आहे. मग यावर काय मार्ग काढता येऊ शकेल? काही गोष्टी करता येतात का ते पहा

  • तुमची समस्या तुमच्या प्रेयसीला समजावून सांगा. ती तुमच्या इतकी जवळची अाहे की तिला ते समजू शकेल.
  • फोन करण्याची, मेसेज करण्याची वेळ ठरवून घ्या आणि ती पाळा. ठरलेल्या वेळी तुमचा मेसेज किंवा फोन आला की तीही नक्कीच खूश होईल. तिची तिलाही कामं असतीलच ना…
  • भर अभ्यासात तिचा फोन उचलला नाही, गप्पा मारल्या नाहीत म्हणजे तुमचं प्रेम नाही असा काही अर्थ होत नाही त्यामुळे जेव्हा खरंच लक्ष विचलित होऊ द्यायचं नसेल तेव्हा फोन घेऊ नका किंवा थोडा वेळ फोन चक्क बंद करून ठेवा.
  • प्रेमामध्ये एकमेकांशी संवाद साधणं जसं महत्त्वाचं असतं तसंच एकमेकांना आवश्यक अशी स्पेस देणंही गरजेचं असतं. त्याबद्दल एकमेकांशी बोला. फोन, मेसेज, मिस्ड कॉल, एकमेकांचे फोटो पाठवणं, हे सगळं नसण्याच्या काळातही लोक प्रेम करतच होते. त्यामुळे या गोष्टींचं दडपण घेऊ नका.

प्रेयसी गोड असेल तशी समजूतदारही नक्कीच असेल. तिला हे पटेल अशी खात्री आहे.
ऑल द बेस्ट, प्रेमासाठी, परीक्षेच्या अभ्यासासाठी आणि तुमच्या दोघांच्या भविष्यासाठी!

आपले उत्तर प्रविष्ट करा

17 + 19 =