फायमोसिस: चेऑपरेशन करण्यासाठी नेमक्या कोणत्या डॉक्टरचा सल्ला कींवा आपरेशन साठी दाखवावे लागेल कारण हया गोष्टी खुप जागी फसवणु होत असते . त्या साठी त्तचा रोग तज्ञ डॉक्टर यांचा सल्ला लागेल का ? या साठी विशेष तज्ञ असतात उपाय सागां

909
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsफायमोसिस: चेऑपरेशन करण्यासाठी नेमक्या कोणत्या डॉक्टरचा सल्ला कींवा आपरेशन साठी दाखवावे लागेल कारण हया गोष्टी खुप जागी फसवणु होत असते . त्या साठी त्तचा रोग तज्ञ डॉक्टर यांचा सल्ला लागेल का ? या साठी विशेष तज्ञ असतात उपाय सागां
Anonymous asked 5 years ago
1 Answers
let's talk sexuality answered 5 years ago

१. फायमॉसिस हा त्वचेचा आजार किंवा रोग नाही. त्यामुळं त्वचारोग तज्ञांचा सल्ला नाही घेतला तरी चालेल.

२. फायमॉसिसचं ऑपरेशन करण्यासाठी तुमच्या संपर्कातील कोणत्याही सर्जनकडे करता येऊ शकतं. यासाठी सेक्सॉलॉजिस्टची गरज नसते.

३. आता मुद्दा राहतो फसवणुकीचा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनुभव फार महत्वाचा असतो. डॉक्टर फसवणुक करणार नाही याची खात्री देणं फार कठीण आहे. याचा अर्थ सर्वच डॉक्टर फसवणुक करतात असा अजिबात नाही. शिवाय खर्चाचा मुद्दादेखील अनेकांसाठी महत्वाचा असू शकतो. त्यामुळं तुमच्या माहितीमधील जे कोणी सर्जन असतील त्यांना भेटून सल्ला घ्या. अगदी तुमच्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादे चांगले डॉक्टर तुम्हाला मिळू शकतील.

हे नेहमी लक्षात ठेवा, सेकंड ओपिनियन महत्वाचं असतं. यात गैर काही नाही. जर तुम्हाला कोणी सर्जरी करण्याचा सल्ला देत असेल तेव्हा दुसर्‍या एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्ही निर्णय ठरवा.