प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsफ्रेंच किस केल्याने वा मुखमैथुन केल्याने HIV होतो का?

1 उत्तर

HIV चे लाळेतील प्रमाण अगदी नगण्य असते. मुखमैथुनाने वा चुंबनाने लाळेचे मोठ्या प्रमाणात अदलाबदल होण्याची शक्यता नसते. चुंबन घेताना HIV चा मुखात प्रवेश झाला तरी विषाणू गिळले जाण्याची शक्यता अधिक असते. जठराच्या माध्यमातुन HIV संक्रमण प्रौढ व्यक्तिमध्ये होत नाही. तोंडातील लहान जखमांमधून HIV प्रवेश करण्याची शक्यता केवळ सैंद्धातिक आणि काल्पनिक असू शकते, पण नाकारता येत नाही. निरोधचा वापर न करता मुखमैथुन केल्यास इतर लिंगसांसर्गिक आजाराचे संक्रमण होण्याची शक्यताही आहेच, तेव्हा सुरक्षितता म्हणुन निरोधचा वापर करावा.
तोंडाच्या निरोधबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा.
https://letstalksexuality.com/dental-dam/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 15 =