बाईचे स्खलन केव्हा होते

1,439
प्रश्नोत्तरेबाईचे स्खलन केव्हा होते
Anonymous asked 5 years ago
1 Answers
let's talk sexuality answered 5 years ago

स्त्री आणि पुरुष यांची जनेनंद्रियांची रचना वेगवेगळी आहे. पुरुषांची जनेनंद्रिय शरीराच्या बाहेर तर स्ञीयांची शरीराच्या आतमध्ये असतात. पुरुषाचा लैंगिक सुखाचा परमोच्च क्षण(orgasm) हा वीर्यस्खलन असतो. तसचं स्त्रियांचा परमोच्च क्षण त्यांच्या शिश्निकेला (मूञामार्गाच्या वरचा भाग) कुरवाळून(हलवून) मिळवता येतो. माञ परमोच्च आल्यावर योनीतून कोणत्याही प्रकारचे स्खलन होत नाही. लैंगिक भावना उद्यपीत झाल्यावर लैंगिक संबंध सुखकर होण्यासाठी स्ञीयांच्या योनीतून आणि पुरुषांच्या लिंगातून स्राव बाहेर पडत असतं, परंतू याला स्खलन म्हणत नाही.