प्रश्नोत्तरेबायकोची योनि तोँडाने चोकल्यावर घाण वास येतो ती तोंडात घेऊ वाटत नाही उलटी आल्यागत होते सगळ्याच महिलांच्या योनित असा घाण वास येतो का

1 उत्तर

पहिलं म्हणजे घाण वास-छान वास, सुगंध-दुर्गंध हे आपण गंधांना दिलेले अर्थ आहेत हे समजून घ्यायला हवं. ते आपले समज आहेत. इंग्लिश मध्ये त्याला पर्सेप्शन्स म्हणतात. काही वास आपल्याला आवडतात, काही नाही आवडत. त्यातही कुणाला काय आवडेल हे सांगता येत नाही. म्हणजे बघा पेट्रोल चा वास अनेकांना आवडत नाही, अनेकांना विशेष आवडतो. असो.

आता तुमचा प्रश्न. तुम्हाला तो वास आवडत नसेल तर तुम्ही त्यापासून दूर राहा. एकमेकांना आनंद देण्याचे आणखीही पर्याय आहेत ते वापरा. स्त्रियांच्या योनीचा भाग हा कायम ओलसर आणि दमट असतो. मासिक पाळीचे रक्त आणि इतर स्त्राव इथेच स्त्रवत असल्या कारणाने तिथे जीवाणूंची संख्याही अधिक असते. लघवीच्या आणि शीच्या जागेपासून हा भाग खूप जवळ असल्यामुळे (माणसांच्या विष्ठेत अनेक नको असलेले रोग कारक जंतू असतात) संसर्ग होण्याची श्यक्यता गृहीत धरून अनेक मित्र जीवाणूही तिथे असतात. ह्या सर्वाचा परिणाम म्हणून एक विशिष्ट वास योनीला असतो.

पण ह्या सोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर जंतूसंसर्ग झाला असेल, जखम किंवा व्रण आले असतील, अंगावरून जात असेल, खाज असेल तर हा गंध अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. संसर्गाचे ते एक लक्षण आहे. तुमच्या मैत्रिणीला काही त्रास होत असेल तर त्यांनी आणि तुम्ही दोघांनीही डॉक्टरांचा सल्ला घेणं चांगलं..

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 4 =