प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबायकोला रोज सेक्स आवडते, रोज सेक्स करावा की नाही योंनी सैल होते का?

1 उत्तर

खूप चांगली गोष्ट आहे की, तुम्ही तुमच्या बायकोच्या लैंगिक इच्छेची दखल घेत आहात. कधी, कितीवेळा, सेक्स करायचा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. रोज सेक्स करण्याचा आणि योनी सैल होण्याचा काहीही संबंध नाही. सेक्स ही स्वतःच्या आणि परस्परांच्या शरीराला आणि मनाला आनंद देणारी कृती आहे. त्यामुळे रोज सेक्स करावा की नाही हे तुम्ही दोघे मिळून ठरवू शकता.

हे मात्र खरं की योनीला सैलपणा येण्यामागे इतर काही कारणे असू शकतात, जसे की वयोमानानुसार काही शारीरिक बदल होणे, वारंवार होणारी बाळंतपणे… अशावेळी काही स्त्रियांना ही समस्या जाणवते. यासाठी काही व्यायाम पद्धती किंवा वैद्यकीय उपचार घेता येतात.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/kegel-exercise/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 13 =