प्रश्नोत्तरेबायको आणि मुलाला एडस नाही हवाव

1 उत्तर

तुमचा प्रश्न जास्त विस्ताराने विचारला तर आम्हाला उत्तर देणं सोपे जाईल. तुम्हाला एड्स होण्याची फक्त शक्यता आहे की एड्स आजाराचे निदान झाले आहे, हे समजू शकले नाही. एच. आय. व्ही. ह्या आजाराची लागण होण्याची अनेक मार्ग आहेत. यात ज्या व्यक्तीला एच.आय.व्ही. ची लागण झाली आहे. अशा व्यक्ती बरोबर असुरक्षित संभोग, एच.आय.व्ही. बाधित व्यक्ती जर इंजेक्शन द्वारे नशा घेत असेल तर व त्याने वापरलेले इंजेक्शन चे निर्जंतुकीकरण न करता दुसऱ्या व्यक्तीने नशा घेण्यासाठी वापर केला तर इंजेक्शन मध्ये असलेले एच.आय.व्ही. बाधित रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या रक्तात मिसळून त्याला एच.आय.व्ही. ची लागण होते. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिले तर, एच.आय.व्ही. संसर्गितमातेच्या बाळंतपणाच्या वेळी मुल योनीतून बाहेर येताना मातेने त्या नवजात बाळाला स्तनपान केल्यामुळे बालकाला एच.आय.व्ही. ची लागण होऊ शकते. यापैकी जर काही तुमच्या आयुष्यात काही झाले असेल तर ताबडतोब चाचणी करा आणि आजार आहे की नाही याची खात्री करून घ्या. हे रक्ताच्या चाचणीतून कळू शकेल. एलायझा या चाचणीची किंमत कमी असल्याने मुख्यतः याच चाचणीचा वापर केला जातो. या चाचणीची मर्यादा अशी की, एच. आय. व्ही ची लागण झाल्यावर तीन महिन्याच्या आत ही चाचणी केली, तर ती बिनचूक उत्तरं देईलच असं नाही. म्हणूनच या तीन महिन्यांना ‘गवाक्ष काळ’ (विंडो पिरिअड) म्हणतात. म्हणून ही चाचणी आणखी तीन महिन्यांनी पुन्हा एकदा करावी. जर आजाराचे निदान झाले असेल तर नियमित औषधे,व्यायाम ,सकस आणि ताजे अन्न, नियमित वैद्यकीय तपासणी व मानसिक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी समुपदेशनाचा लाभ या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.इतर आजाराप्रमाणे एच. आय.व्हि हा आजार आहे. तुम्ही स्वत:ची योग्य काळजी घेतलीत तर इतर लोकांप्रमाणे आनंदी जीवन जगू शकता. ह्याविषयी तज्ञ डॉक्टर कडून योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करून घ्यावे . तुमच्या बाबतीत एच.आय.व्ही.चे निदान झाले असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीची व मुलाचीही तपासणी करून घ्यावी व ही चाचणी आणखी तीन महिन्यांनी पुन्हा एकदा करावी. जर निदान झाले असेल जी काळजी तुम्ही घ्यावी असे सुचवले आहे तीच काळजी त्यांनीही घेणे गरजेचे आहे. आणि जर त्यांना एच.आय.व्ही. झाला नसेल तर ज्या कारणांमुळे ( कारणे उत्तराच्या सुरुवातीला नमूद केली आहेत) हा आजार होतो ती कारणे लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 1 =