हे तुम्ही तुमच्या बायकोसोबत मिळून ठरवणं जास्त योग्य असेल. दिवसातून ‘किती वेळा आणि किती अंतर’ असं काही मोजमाप नाही. परंतु ही क्रिया संभोग करणाऱ्या व्यक्तींच्या किंवा जोडीदारांच्या परस्पर संमतीनं होणं आवश्यक आहे. दोघांचीही इच्छा आणि आनंद महत्वाचा आहे. लैंगिक सुख किंवा आनंद केवळ लैंगिक संबंध (शिश्नाचा योनीमध्ये प्रवेश) इतकेच मर्यादित नसून यामध्ये विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. जसे की, शारीरिक जवळीक, स्पर्श, प्रणय, चुंबन अशा क्रियांचा समावेश असतो. एकमेकांशी बोलून दोघांनाही आवडतील असे लैंगिक सुखाचे पर्याय शोधू शकता.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा