प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsबायको सेक्सला किळसपणा, संकोच, काहीतरी चुकीच करतो अस समजते मिठी माऊ देत नाही ?

1 उत्तर

प्रत्येकाची लैंगिक सुखाची, तृप्तीची कल्पना वेगळी असू शकते त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला काय आवडते हे एकमेकांशी संवाद साधा. आपल्या समाजात लैंगिकतेविषयी चुकीचे गैरसमज निर्माण केले आहे. अगदी लहानपणापासून आपल्याला त्याप्रमाणे शिकवलं जातं. साहजिकच सेक्सविषयी मनात किळसवाणे वाटणे किंवा संकोच वाटणे अगदी स्वाभाविक आहे. तुमच्या जोडीदाराच्या मनात सेक्सविषयी भीती असू शकते. त्यामुळे तुम्ही जोडीदाराशी योग्य असा संवाद साधून त्यांच्या मनातील सेक्सविषयी असणारी भीती, संकोच, तिच्या मनातील गैरसमज दूर करा. तुमच्या दोघांमधील संवाद वाढवा. तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 18 =