प्रश्नोत्तरेबायको सेक्ससाठी तयार होते पण पुढाकार घेत नाही

1 उत्तर

सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा प्रश्न विचारलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. आपल्याकडे स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य, लैंगिक भावना असतात हेच नाकारले जाते. तुम्हाला लैंगिक संबंधांमध्ये जोडीदाराचा देखील सहभाग असावा, तिनंदेखील पुढाकार घ्यावा असं वाटतंय ही खूप सकारात्मक गोष्ट आहे.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये विविध कारणांमुळे लैंगिक संबंधांविषयी मोकळेपणा नसतो आणि अनेक स्त्रिया पुढाकार घेत नाहीत. काहीवेळा इच्छा असूनही त्या पुढाकार घेत नाहीत. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांनी कसे बोलावे, कसे राहावे आणि कसे वागावे याविषयीचे कुटुंबाने आणि समाजाने काही नियम ठरवून दिले आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीत पुढाकार घेण्यास नाकारले जाते आणि बंधनं घातली जातात. लहानपणापासून त्यांची जडणघडण देखील तशीच झालेली असते. त्यातही सेक्स म्हणजे न बोलण्याचा, वाईट विषय असा आपल्या समाजातील समज. पुरुषांनी पुढाकार घेणं, याविषयी बोलणं हे मर्दपणाचं लक्षण असतं मात्र बाईनं असं करणं म्हणजे चुकीचं आणि वाईट असं ठरवूनच दिलेले आहे.

सेक्सबाबत मनात असलेली भीती, लाज, संकोच यामुळे पुढाकार घेणं अवघड होऊ शकतं. एखाद्या स्त्रीने जर पुढाकार घेतलाच तर नको ती वाईट लेबल तिला लावली जातात, अनेक गोष्टींसाठी गृहीत धरले जाते. त्यामुळे तुम्हाला इथे गरज आहे ती तुमच्या पार्टनर बरोबर योग्य संवादाची. तिच्या आवडी-निवडी जाणून घ्या, तिची इच्छा आणि संमती लक्षात घ्या. तिलाही पुढाकार घेण्यास मदत होईल अशी स्पेस तयार करा.

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 7 =