प्रश्नोत्तरेभावाच्या बायकोसोबत सेक्स

BHAVACHI BAKYO LA SEX KLE CHALELE KA

1 उत्तर

तुमच्या प्रश्नाला आणि परिस्थितीला अनेक पैलू आहेत. खरं तर हा एकाच वेळी तुमचा दोघांचा एक-एकट्याचा, वैयक्तिक आणि त्याच वेळी दोघांनी मिळून घ्यायचा असा निर्णय असणार आहे. मला नाही वाटत तिसरी कोणी व्यक्ती या विषयात मत देऊ शकते. तुम्ही तुमचे वय नमूद केले नाही. तुम्ही दोघंही सज्ञान आणि प्रौढ असाल तर  स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याच्या स्थितीतही असाल कदाचित.
त्या तुमच्या भावाची बायको आहेत म्हणजे त्या विवाहित आहेत, तुम्ही तुमच्या वैवाहिक स्थिती विषयी काही लिहिलेले नाही. उघड आहे तुमचे हे संबंध तुम्ही जगासमोर स्वीकारण्याच्या स्थितीत नसणार आहात. ते लपवावे लागतील. कारण आपल्या समाजात ते स्वीकारले जाण्याची शक्यता नाही. तुमची व तुमच्या काकूंची ते स्वतःच तसे स्वीकारण्याची तयारी आहे का? प्रश्न भावाच्या पत्नीसोबत संभोग करण्यापुरता मर्यादित नाही. प्रश्न नात्यांमधल्या विश्वासाचा देखील आहे. समाज रचनेनुसार नैतिकता-अनैतिकतेच्या कल्पना बदलत असतात. आज लग्नाव्यतिरीक्तक्या लैंगिक संबंधाना अनैतिक मानलं जातं. अनेक वेळा असे लैंगिक संबंध हे जोडीदाराला विश्वासात घेवून ठेवले जात नाही.
तुम्ही दोघंही वेगवेगळ्या कुटुंबाचा भाग आहात असं दिसतं आहे आणि कदाचित तुम्ही आपापल्या कुटुंबाप्रति जबाबदारही असाल. अशा गोष्टीचं काय करायचं, जबाबदाऱ्या पेलायच्या कि त्यांचं ओझं फेकून द्यायचं असे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. एक मात्र खरं जर आपण जाणतेपणी, स्वतःहून काही स्वीकारलं असेल तर ते निभावणं किंवा त्याचा तार्किक आणि संवेदनशील समारोप करणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट परिस्थितीने अथवा आणि कोणी लादली असेल तरी. असो.
फार तत्विकतेत न जाता एवढंच म्हणेन कि निर्णय काहीही घ्या पण त्याच्या परिणामांची जाणीव ठेवा आणि जबाबदारीही घ्या. त्यापासून पळून जाऊ नका किंवा माझा काही संबंध नाही असं नंतर म्हणू नका. कारण बहुतेक वेळेस पुरुषासाठी हे सोपं असू शकतं, बाईसाठी नाही…
लैंगिकता एक असा प्रांत आहे कि जेथे सहसा इतरांच्या वर्तनाला जज करण्याचा अधिकार प्रत्येकाने घेतलेला असतो, स्वतःच्या सोडून…

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 5 =