प्रश्नोत्तरेमला कुणाबद्दलच प्रेम वाटत नाही.

1 उत्तर

ठीक आहे. यात काळजी करण्याचं काहीही कारण नाही. नाही प्रेम वाटत तर नाही वाटत. त्याचं टेन्शन घेऊ नकोस. शिवाय स्वतःला अपराधी समजू नकोस. आपण सगळे मानव आहोत. आपण सगळे एक आहोत तरी आपल्यातला प्रत्येक जण वेगळा आहे. माझा रंग काळा आहे पण माझी मैत्रीण गोरी आहे. मी जाड आहे तर माझा भाऊ लुकडा. काही जण प्रेमात पडतात तर काहींना प्रेमाशी काहीच देणं घेणं नसतं. काहींच्या शरीरावर केस असतात तर काहींच्या नसतात. तरीसुद्धा आपण सगळे मानव आहोत. आपली शरीरं जशी वेगळी आहेत तशाच आपल्या भावना आणि कल्पनादेखील भिन्न आहेत. आपल्या आवडी निवडी वेगवेगळ्या असल्या तरी आपला उगम एकच आहे.

काही मुलींना 10 व्या वर्षीच पाळी येते तर काहींना येतच नाही. काही मुलांना झोपेत वीर्य बाहेर येण्याचा अनुभव आला असेल तर काहींना नाही. काही स्त्रिया आई होतात तर काही ठरवून मुलं जन्माला घालत नाहीत. काहींना पुरुष आवडतात तर काहींना स्त्रिया. काहींना संग करायला, सेक्स करायला आवडतं तर काहींना त्यात काडीचा रस नाहीये.

या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. आपण जसे आहोत तसं असणं नॉर्मल आहे. आणि आपण इतरांपेक्षा वेगळे असलो तरी त्यात वावगं काही नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा

20 + 4 =