प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला तिला रोज करावं वाटत पण तिची तेवढी क्षमता नाही. मी काय करू जेणेकरून तिची पण रोज करून घ्या ची क्षमता होईल

1 उत्तर

तुमचे तुमच्या जोडीदारावर प्रेम आहे का? प्रेम असो अथवा नसो, तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किमान आदर आणि तिची काळजी आहे का? कुठल्याही नात्यात अपेक्षित, गरजेच्या आणि ‘मस्ट’ अशा या गोष्टी आहेत. जर तुम्हाला आदर आणि काळजी असेल तर कृपया तिच्या क्षमता वगेरे वाढवण्याच्या फंदात पडू नका. कसल्याही गोळी किंवा औषधाने अशा क्षमता वाढत नासतात. विज्ञानाकडे असा कुठलाही उपाय नाही. मुळात लैंगिक भावना अशा जबरदस्तीने निर्माण करता येत नाहीत. उलट कुठल्याही दबावाखाली त्या मारतात. त्या सहज याव्या लागतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, तणाव रहित दैनंदिन जीवन, नात्यातील ओलावा, आपुलकी, प्रेम, समंजस जोडीदार, संमती ह्या गोष्टी सुखी आणि समाधानी लैंगिक जीवनासाठी महत्वाच्या आहेत. लैंगिक इच्छा निर्माण होण्यावर या गोष्टींचा अधिक प्रभाव असतो. तुम्हाला लैंगिक इच्छा रोज होते म्हणून तुमच्या जोडीदाराला ही तसेच वाटावे याची आवश्यकता नाही. तिची समती नसेल तर ती जबरदस्तीच ठरेल.

आपले उत्तर प्रविष्ट करा

10 + 5 =