प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला दिराबरोबर सेक्स करायची इच्छा आहे त्याचे वय 22 आहे आणि माझे वय 30 आहे त्याचे लिंग बर्यापैकी मोठे आहे मी त्याचे लिंग तो अंघोळ करताना पाहिले आहे तेव्हा पासून मला त्याच्या बरोबर सेक्स करण्याची इच्छा होतेय
1 उत्तर

आपली लैंगिकता व्यक्त करण्याचा, त्यासाठी (रक्ताचे नाते संबंध सोडून) जोडीदार निवडण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. लैंगिक इच्छा ही सामन्य पण मुलभूत गरज आहे.

तुम्ही सांगितल्या प्रमाणे तुम्ही दोघेही सज्ञान आहात, आपले लैंगिक नाते ठरवण्यासाठी सक्षम आहात. तुम्हाला वाटणाऱ्या भावना सहज आहेत. त्यात काही घाण अथवा अपवित्र वगेरे नाही. पण चुकीचे आहे का? ते मला सांगता येणार नाही किंवा मी म्हणेन ह्याचा विचार आणि निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे. आणि त्या निर्णयाची जबाबदारीही तुमचीच आहे. तुमचा दीर तुमच्या पेक्षा लहान आहे म्हणूनही ही तुमची अधिक जबाबदारी बनते. लग्नसंबंध, पती-पत्नीचे नाते, कमिटमेंट, ह्या संबंधातून उद्भवू शकणारी परिस्थिती आणि त्याचे कुटुंब आणि त्यातील व्यक्तींवर होणारे परिणाम ह्या सर्वांचा विचार तुम्हाला करावा लागेल. तुम्हाला भीती वाटावी म्हणून हे आम्ही लिहित नाही तर तुमचा निर्णय अधिक डोळस असावा म्हणून हे लिहिले आहे.

आणखी एक गोष्ट. ह्या संबंधाना जशी समाजाची मान्यता नाही तशीच कायद्यासामोरही असे नाते तुमच्या विरोधात जाऊ शकते. तुमच्या पतीला ह्या नात्याच्या आधारावर तुमच्याकडून घटस्फोट मागता येवू शकतो. तेव्हा तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्हीच ठरावा…

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 18 =