मला मुखमैथुन फार आवडते, पण पत्नी लिंग चाटत नाही. माझी खूप इच्छा आहे तिने पण चाटावे तिला कसे पटवुन देऊ?

1,202
प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमला मुखमैथुन फार आवडते, पण पत्नी लिंग चाटत नाही. माझी खूप इच्छा आहे तिने पण चाटावे तिला कसे पटवुन देऊ?
मुखमैथुन asked 4 weeks ago

 

 

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

1 Answers
let's talk sexuality answered 4 weeks ago

सर्वात आधी तुम्हाला एखादी लैंगिक कृती करायची तयारी/ इच्छा आहे ही बाब तुमच्या जोडीदारापर्यंत न लाजता पोहोचवणे महत्वाचे आहे. तुमची इच्छा तुम्ही स्पष्टपणे जोडीदाराशी बोलू शकता. संवादाने बरेच प्रश्न मार्गी लागतात. त्यासाठी बराच काळ द्यावा लागू शकतो.
जोडीदार नाही का म्हणत आहे याबाबत बोलू शकता. त्या कारणांवर दोघे मिळून उपाय शोधू शकता. तसेच मुखमैथुन करताना सावधानगिरी कशी घेता येईल त्याबाबतही बोलू शकता. (मुखमैथुन करताना घ्यायच्या काळजीकरीता सोबतची लिंक पहा. https://letstalksexuality.com/dental-dam/)
जर तुमची इच्छा तुमच्या जोडीदाराला मान्य असेल तर सोबतच्या लिंकनूसार सावधानगिरी वा काळजी घेऊन तुम्ही मुखमैथुन करु शकता.
पण जशी तुमची इच्छा महत्वाची वाटते तशीच तुमच्या जोडीदाराचीही इच्छा महत्वाची आहे हे ही लक्षात घ्यायला हवे. जर जोडीदाराची इच्छा नसेल तर त्यांच्या भावनांचा आदर करणे तितकेच गरजेचे आहे.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Your Answer

4 + 18 =