प्रत्येक स्त्री-पुरुषाचा संभोग करण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. दुसर्यासोबत तुलना करणं चुकीचं ठरेल. दोन्हीही जोडीदारांच्या उत्कटेच्या पातळीवर संभोग क्रियेचा कालावधी अवलंबून असतो. अनेकवेळा संभोगाचा अर्थ फक्त लिंग योनीमध्ये टाकणं एवढाच घेतला जातो. खरतरं संभोगापूर्वीचा प्रणय देखील तितकाच महत्वाचा असतो. पण याकडं बरेचवेळा दुर्लक्ष केलं जातं. पॉर्न क्लिपमधून दाखवलेला जास्त कालावधीचा संभोग हा कृत्रिम असतो. पण अशा जास्त वेळ चालणार्या संभोगाच्या क्लिप्स पाहून मनामध्ये न्यूनगंड तयार होतो. याला छेद देणं आवश्यक आहे. जोडीदारामधील उत्तम परस्पर समजुतदारपणा संभोग क्रियेचा कालावधी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. बधीरता आणणारी विशिष्ट औषधे शिश्नावर लावली तर शिश्नाची संवेदना घटल्याने वीर्यपतन विलंबाने होऊ शकते. परंतु सामान्यतः हे लक्षात ठेवणं चागलं की औषधी उपायांपेक्षा जोडीदारांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हा उत्तम पर्याय आहे.
1 उत्तर
आपले उत्तर प्रविष्ट करा