कोणतीही गोष्ट करायची म्हणजे कधी तरी पहिल्यांदा करावी लागतेच ना? तुम्हालाही संधी मिळेल. ही सगळी शिकण्याची प्रक्रिया आहे. आपल्या पूर्ण वेबसाईटला भेट द्या. या विषयावरचे वेगवेगळे लेख तुम्हाला वाचायला मिळतील.
काय योग्य अन काय अयोग्य याबाबतचा निर्णय तुमचा तुम्हालाच घ्यावा लागेल. तो घेण्यासाठी काही गोष्टीचा विचार करा. जसे की, तुम्हाला आवडणारी गोष्ट ही तुमच्या सोबतच्या जोडीदारालाही आवडते का? यासाठी विचारावा लागते, संवाद करावा लागतो. कुणाच्याही परवानगी शिवाय काहीही करणं गैरलागू आहे (जरी लग्नाची बायको असली तरीही). अन असंच कुणालाही पाहून काहीही करावंसं वाटणं अन त्यावर काहीही अमंलबजावणी करण्याचा प्रयत्न ही करणे हे व्यक्ती म्हणुन कुणासाठीही बरोबर नाही (हा कायद्याने गुन्हा ही आहे). तुम्ही काळजी घ्याल अशी आशा आहे (लैंगिक इच्छा अनावर झाल्यास हस्तमैथुनाचा पर्याय तुम्हाला आहेच).
काही प्रश्नांची उत्तरे सोबतच्या लिंक मध्ये आहे नक्की वाचाल