प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमहीलांचे कपडे घालावेसे वाटते.

1 उत्तर

प्रत्येक व्यक्तीची लैंगीकता आणि लैंगिक आवड ही वेगवेगळी असू शकते. लैंगीकतेमध्ये शारीरिक, भावनिक, बौद्धिक व सामाजिक पैलूंचं पुरुषी व स्त्रीत्वाचं त्या व्यक्तीचं प्रकटीकरण असू शकते. लिंगभाव (जेंडर आयडेंटिटी) समजून घेण्यासाठी स्त्री व पुरुष यांचे गुणधर्म व त्यांची विभागणी समजून घेणे गरजेचे आहे. समाजाने ही विभागणी “पुरुषी आणि बायकी” अशी केलेली आहे आणि याला खूप मर्यादाही असतात. अगदी ढोबळ पद्धतीने सागायचे झाले तर आपण मुख्यता स्वतःला स्त्री म्हणून अनुभवतो का पुरुष म्हणून अनुभवतो तो आपला लिंगभाव असतो. जसे प्रत्येकाचे शारीरिक लिंग असते तसेच प्रत्येकाचे एक मानसिक लिंग असते आपल्या मानसिक घडणीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती स्वतःला स्त्री किंव्हा पुरुष समजू लागते.                                                                                              प्रत्येक गुणधर्माच्या अनेक छटा असल्यामुळे अनेकांचा लिंगभाव पूर्णपणे पुरुषाचा किवां स्त्रीचा नसतो. यातील काही प्रकार पुढील प्रमाणे :: ट्रान्सव्हेस्टाइटस : यात बहुतांशी वेळा भिन्नीलिंगी लैंगिक कलांचे पुरुष असतात. व त्यांचा प्रामुख्याने स्त्रीचा असतो अधून मधून या पुरुषांना स्त्री चे कपडे घालायला आवडतात.स्त्रीसारखी वेशभूषा करण्याची आवड एवढी एकच स्त्री लिंगभावाची छटा यांच्या दिसते.    ट्रान्सजेंडर :ज्या व्यक्तीचं शारीरिक लिंग एक आहे व त्यांचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे अशांना  ट्रान्सजेंडर म्हणतात. काही वेळा मुलांना ते लहानाचे मोठे होत असताना सातत्याने असे वाटते कि ते मुलगी आहेत याचा अर्थ मुलांची नैसर्गिक घडण अशी होते कि त्याचं शरीर मुलाचे आहे (लिंग,वृषन इ.) पण मानसिक घडण मुलीची असते. शारीरिकदृष्ट्या तो मुलांनंसारखा आणि मानसिकदृष्ट्या त्याच भावविश्व स्त्री सारख असतं प्रत्येकाचा लिंग भाव नैसर्गिक असतो. तो शिकून शिकून घडत नसतो त्यासठी स्वतःची  जेंडर आयडेंटिटी समजून घ्यायला हवी .स्वतःला काय वाटतेय हे समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि यात काहीही वाईट किंवा वावगे असे नाही आहे. साभार : मानवी लैंगीकता एक प्राथमिक ओळख- बिंदू माधव खिरे यांच्या पुस्तकातून. या विषयीच्या अधिक माहिती साठी पुढील संकेतस्थळाला नक्की भेट द्या . https://letstalksexuality.com/diversity-sexual-orientations/

आपले उत्तर प्रविष्ट करा

4 + 14 =