प्रश्नोत्तरेमाझं एका मुलीवर प्रेम आहे पण तीचं माझ्यावर प्रेम आहे का ते कसे ओळखावे

1 उत्तर

उत्तर अगदी सोपं आहे. तिचे तुमच्या प्रेम आहे की नाही हे तीच तुम्हाला सांगू शकेल. तुमच्या मनातील प्रेम भावना तिच्याजवळ व्यक्त करा. अवघड वाटतंय ना ? अनेक शंका, प्रश्न, भीती मनात येत असतील… प्रेम कसं व्यक्त करणार ? ती हो म्हणेल का ? तिला काय वाटेल ? ती नाही म्हणाली तर ? पण उत्तर हवं असेल तर या सगळ्याला सामोरं तर जावं लागेलच…

जास्तीत जास्त काय होईल ? ती नाही म्हणेल… नाही म्हणाली तर त्याचाही आदर ठेवा. तुमचे तिच्यावर प्रेम आहे म्हणजे तिचे असायलाच हवे याचा आग्रह नको.

आणि हो म्हणाली तर ? पुढचे मी सांगायला नको… 🙂

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 19 =