माझी बायको मला सेक्स करायला देत नाही

18,574
प्रश्नोत्तरेमाझी बायको मला सेक्स करायला देत नाही
Anonymous asked 4 years ago
1 Answers
let's talk sexuality answered 4 years ago

तुमची जोडीदार सेक्स किंवा लैंगिक संबंध करायला नकार देते यामागे अनेक कारणे असू शकतात. जोडीदार लैंगिक संबंधांसाठी नकार का देते हे समजून घेण्यासाठी तुमच्यामध्ये आणि तुमच्या जोडीदारामध्ये संवाद असणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला आणि जोडीदाराला लैंगिक ज्ञान आहे का? कोणती भीती किंवा काळज्या आहेत का ? सेक्समधून आनंद मिळतोय का? तीला सेक्स करताना काही त्रास तर होत नाही ना? लैंगिक संबंध करत असताना तीला काय आवडते? काय आवडत नाही, या मुद्द्यांवर संवाद करणे गरजेचे आहे. बरेचजण जोडीदाराशी या विषयावर संवाद साधताना दिसत नाहीत. लैंगिक संबंध ही एकमेकांच्या संमतीने आणि सोबतीनं करण्याची बाब आहे. आपल्यासह आपल्या जोडीदारालासुद्धा लैंगिक सुख मिळत आहे का याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. परस्परांना आनंददायी लैंगिक अनुभव हवा असेल तर चांगला संवाद असणं अपरिहार्य आहे. नात्यामध्ये समजुतदारपणा, संमती आणि समानता या गोष्टी चांगल्या आणि मनमोकळ्या संवादासाठी पूरक ठरतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही लैंगिक इच्छा आणि आवड निसर्गाने दिली आहे. पण सामाजिक प्रभावामुळे व नियंत्रणामुळे स्त्रियांना आपली लैंगिक इच्छा प्रकट करण्यावर बंधने असतात. त्यामुळे त्यांच्यात लैंगिक खुलेपणा येण्यास वेळ लागू शकतो. म्हणून पुरुषांनी समजुतदारपणा दाखवणे गरजेचे आहे. लैंगिक आयुष्य जास्त आनंददायी बनवण्याकरिता जोडीदाराशी छान मैत्री, मनमोकळा संवाद, एकमेकांना निवांत वेळ वेळ देणं, लैंगिक क्रियांमध्ये कल्पकता आणि नाविन्य आणणं खूप आवश्यक आहे.